महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – गणेश भड – बुलढाणा- सैनिकी मुलांचे वसतिगृह, बुलडाणा येथे निव्वळ कंत्राटी तत्वावर तसेच मासिक एकत्रित मानधनावर शैक्षणिक वर्ष 2020-21 करीता पद भरती करण्यात येत आहे. या पदाकरीता जिल्ह्यातील माजी सैनिक / माजी सैनिक विधवा पत्नी तसेच इतर इच्छूक नागरिक यांच्याकडून 18 जुनपर्यंत अर्ज मागविण्यात आले आहे. तरी इच्छूकांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, बुलढाणा येथे अर्ज सादर करावेत.
ही पदभरती सहा पदांसाठी होत आहे. सहा्यक वसतिगृह अधिक्षक पदाकरीता माजी सैनिक हवालदार, चौकीदार साठी माजी सैनिक, सफाईवालाकरीता माजी सैनिक / इतर नागरिक आणि स्वयंपाकीन पदाकरीता माजी सैनिक विधवा पत्नी किंवा अन्य नागरिकांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच सैनिक बहुउद्देशीय सभागृह, बुलडाणा येथे सभागृह व्यवस्थापक व सफाईवाला या पदांवरसुद्धा कंत्राटी पद्धतीने व एकत्रित मानधनावर 11 महिन्याच्या करारावर भरती करावयाची आहे. यामध्ये सभागृह व्यवस्थापक पदासाठी माजी सैनिकी सैन्यातून सेवा निवृत्त नायब सुभेदार / सुभेदार 55 वर्ष वया पर्यंत, सफाईवालासाठी माजी सैनिक / इतर नागरिकांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. अर्जाच्या छाननीनंतर मुलाखती संदर्भात कळविण्यात येणार आहे. या पदांसाठी वयोमर्यादा 55 वर्षापर्यंत ठरविण्यात आलेली आहे, असे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातर्फे कळविण्यात आले आहे.