2000 Rupee Note: 2000 ची नोट जमा करण्यासाठी बँकेत जाताय; जाणून घ्या SBI, HDFC, ICICI बँकेचे ‘हे’ नियम

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२८ मे । 2000 Rupee Note: आरबीआयने 2000 रुपयांच्या नोटा बंद केल्यानंतर 23 मेपासून त्या परत घेण्याची प्रक्रिया सुरू झाली. याबाबत बँकांकडे लोकांची ये-जा सुरू झाली आहे. 23 मे ते 30 सप्टेंबर दरम्यान रिझर्व्ह बँकेने 2000 रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी बँकेत जाण्याच्या सूचना दिल्या आहेत.

बँकांमध्ये नोटा बदलून घेण्याबाबत लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. आज आम्ही तुम्हाला 2000 रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी विविध बँकांचे काय नियम आहेत ते सांगणार आहोत.

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI):
SBI ने सांगितले आहे की, SBI च्या कोणत्याही शाखेत 2000 रुपयांच्या नोटा 20 हजार रुपयांपर्यंत बदलण्यासाठी लोकांना कोणतेही ओळखपत्र दाखवण्याची किंवा स्लिप भरण्याची गरज नाही.

एचडीएफसी बँक:
23 मे ते 30 सप्टेंबरपर्यंत ग्राहक त्यांच्या HDFC बँक खात्यात 2000 रुपयांच्या नोटा जमा करू शकतात. या बँकेत 2000 रुपयांच्या 20 हजार रुपयांपर्यंतच्या नोटा एका दिवसात बदलता येतील.

आयसीआयसीआय बँक:
ग्राहक कोणत्याही ICICI बँकेच्या शाखेत किंवा बँकेच्या कॅश डिपॉझिट मशीनमध्ये 2000 रुपयांच्या नोटा जमा करू शकतात. ज्येष्ठ नागरिक ICICI बँकेच्या घरोघरी बँकिंग सेवा वापरू शकतात.

या बँकेत 2000 रुपयांच्या नोटा जमा करण्यासाठी कोणतीही निश्चित मर्यादा नाही. यासोबतच 30 सप्टेंबरपर्यंत या प्रक्रियेवर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

कॅनरा बँक:
कॅनरा बँकेत 2000 रुपयांची नोट जमा केल्यावर रोख रकमेवर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. बँकेने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ही माहिती दिली आहे.

पंजाब नॅशनल बँक:
PNB मध्ये 2,000 रुपयांच्या 20,000 रुपयांपर्यंतच्या नोटा बदलण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या ओळखपत्राची आवश्यकता नाही. पीएनबीने आपल्या सर्व शाखांना आधार कार्ड, कोणतेही अधिकृत दस्तऐवज किंवा नोटांच्या अदलाबदलीबाबत कोणताही फॉर्म न भरण्याची सूचना केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *