Gold-Silver Price on 31 May 2023: सोने महागले ; जाणून घ्या आजचा भाव

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .३१ मे । Gold-Silver Price Today: १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ५९,९३० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ५९,५६० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार चांदी ७१,१५० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७०,७४० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार, पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५४,९३६ असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५९,९३० रुपये असेल. मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५४,९३६ रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५९,९३० प्रति १० ग्रॅम आहे.  नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५४,९३६ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५९,९३० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ५४,९३६ आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ५९,९३० रुपये आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *