FDC Drugs Ban : खोकला, तापावरील १४ औषधांवर सरकारची बंदी! ‘येथे’ पाहा धोकादायक औषधांची यादी

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ४ जुन । केंद्र सरकारने ताप, सर्दी, डोकेदुखी यांसारख्या आजारांवरील उपचारामध्ये वापरल्या जाणाऱ्या १४ औषधांवर बंदी घातली आहे. ही औषधे आरोग्यास धोका ठरू शकतात म्हणून हा निर्णय़ घेण्यात आले आहे.

या बंदी घातलेल्या औषधांमध्ये सर्दी आणि ताप यासाठी दिल्या जाणाऱ्या औषधांचा देखील समावेश आहे. ही औषध घेणं हानिकारक असल्याचे सरकारने म्हटले आहे. बंदी घालण्यात आलेल्या औषधांमध्ये निमेसुलाइड आणि विरघळणारे पेरासिटामॉल गोश्या तसेट क्लोफेनिरामाइन मॅलेट, कोडीन सीरप सारख्या औषधांचा देखील समावेश आहे. फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन (एफडीसी)च्या या औषधांवर बंदी घाण्यात आल्याची माहिती शुक्रवारी एका अधिसूचनेतून देण्यात आली होती.

या अधिसूचनेत केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी सांगितले की एफडीसीच्या १४ औषधांचा कुठलाही वैद्यकिय उपयोग नसल्याचे म्हटले आहे. ही औषधे नागरिकांचे आरोग्य धोक्यात टाकू शकतात.

या औषधांवर घातली बंदी
बंदी घालण्यात आलेल्या औषधांमध्ये सामान्य संक्रमण, खोकला आणि ताप या आजारांमध्ये दिली जाणारी औषधांचा समावेश आहे. निमेसुलाइड + पॅरासिटामॉल, क्लोरफॅनिरामाइन + कोडीन सिरप, फॉल्कोडाइन + प्रोमॅथाजीन, एमॉक्सिसिलिन + ब्रॉमहेक्सिन, ब्रॉमहेक्सिन + डॅक्सट्रोमेथॉर्फन + अमोनियम क्लोराइड मेंथॉल, पॅरासिटामोल + ब्रॉमहेक्सिन फॅनिलेफ्राइन + क्लोरफेनिरामाइन + गुइफॅनेसिन आणि सालबुटामॉल + क्लोरफॅनिरामाइन या औषधांचा समावेश आहे.

या प्रकरणी तज्ञांच्या समितीकडून आलेल्या शिफारशींनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. तज्ज्ञांच्या समितीने सरकारला पाठवलेल्या आपल्या शिफारसीमध्ये या एफडीसी औषधांच्या उपचाराबाबत कोणतेही वैद्यकीय पुरावे समोर आलेले नाहीत आणि ही औषधे मानवांसाठी धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे त्यामुळे सार्वजनिक हित लक्षात घेऊन, औषधे आणि सौंदर्य प्रसाधने अधिनियम, १०४० च्या २६ ए नुसार या 14 FDC औषधांचं उत्पादन, विक्री आणि वितरण बंद करणं आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *