Mahabaleshwar : महाबळेश्‍वरला जाताय? मग, ‘या’ मार्गात झालाय मोठा बदल

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ७ जुन । गर्दी वाढल्यामुळे सात ते २५ जून या कालावधीत दर शुक्रवार, शनिवार व रविवारी पाचगणी व महाबळेश्‍वरकडे (Panchgani and Mahabaleshwar) जाणाऱ्या वाहतुकीत पोलिस अधीक्षक समीर शेख (Police Sameer Sheikh) यांनी बदल केले आहेत.

या बदलानुसार मुंबई व पुण्याकडून येणाऱ्या वाहनांनी सुरूर फाटा-वाईमार्गे यायचे आहे; परंतु महाबळेश्‍वरकडून पुणे व मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना या रस्त्याचा वापर करता येणार नाही. या वाहनांनी महाबळेश्‍वरवरून मेढा-कुडाळ-पाचवड फाटा या रस्त्याने महामार्गाकडे जायचे आहे.

पाचगणीवरून पुणे-मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांनी संजीवन विद्यालय-रुईघर-करहर-कुडाळ-पाचवड फाटा या मार्गे पुण्याकडे जायचे आहे. महाबळेश्‍वरवरून कोल्हापूरकडे जाणाऱ्या वाहनांनी मेढा-सातारा या रस्त्याचा उपयोग करायचा आहे. या वाहतूक बदलाबाबत काही हरकती असल्यास disttraffic.satara@mahapolice.gov.in या संकेतस्थळावर पाठवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *