महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १५ जुन । Infinix या मोबाइल कंपनीने आपला नवीन स्मार्टफोन भारतामध्ये लॉन्च केला आहे. Infinix ने आपला Infinix Note 30 5G हा फोन लॉन्च केला आहे. यामध्ये मीडियाटेक Dimensity 6080 प्रोसेसर देण्यात आला आहे. या फोनमध्ये ग्राहकांना कोणकोणते फीचर्स मिळणार आहेत आणि याची किंमत किती आहे याबद्दल जाणून घेऊयात.
Infinix Note 30 5G चे फीचर्स
Infinix नोट ३० ५ जी फोनमध्ये अँड्रॉइड १३ वर आधारित असे XOS 13 मिळणार आहे. याशिवाय वापरकर्त्यांना ६.७८ इंचाचा एचडी प्लस IPS डिस्प्ले मिळेल. ज्याचा रिफ्रेश रेट हा १२० Hz इतका आहे. तसेच डिस्प्लेचा पीक ब्राईटनेस हा ५८० नीटस इतका आहे. यामध्ये मीडियाटेक Dimensity 6080 प्रोसेसरसह ग्राफिक्ससाठी Mali G57 MC2 GPU देण्यात आले आहे. यामध्ये वापरकर्त्यांना ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज मिळणार आहे. याबाबतचे वृत्त gadgets360 ने दिले आहे.
Time to live life in the fast lane with Note 30 5G, thanks to India's first MediaTek Dimensity 6080 Processor, a smooth 120Hz Display, up to 16GB* RAM, and 256 Storage! Sale starts 22nd June, 12PM, only on Flipkart. Click here to know more: https://t.co/6DNmOKpB2z#ChangeTheGame pic.twitter.com/HVXgXOlDtB
— Infinix India (@InfinixIndia) June 14, 2023
कॅमेरा
वापरकर्त्यांना या स्मार्टफोनमध्ये तीन रिअर कॅमेऱ्याचा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये प्रायमरी लेन्स ही १०८ मेगापिक्सलची आहे. बाकीच्या २ लेन्सबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही. सेल्फी आणि व्हिडीओसाठी १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळणार आहे.
Infinix Note 30 5G स्मार्टफोनमध्ये JBL साउंडसह Hi-Res ऑडिओ मिळतो. तसेच यात ४जी आणि ५जी , वाय-फाय, जीपीएस, NFC, 3.5mm चे ऑडिओ जॅक, टाईप सी पोर्ट आणि फिंगरप्रिंट सेन्सर मिळतात. यामध्ये ५००० mAh क्षमतेची बॅटरी आणि ४५ W चा चार्जिंग सपोर्ट दिला आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, गेमर्स बायपास चार्जिंग या फीचरचा वापर बॅटरीचे लाईफ चांगले राहण्यासाठी आणि मदरबोर्डला पॉवर देऊन हीटिंग कमी करण्यासाठी करू शकतात.
किंमत
Infinix Note 30 5G च्या ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत १४,९९९ रुपये आहे. तर ८/१२८ जीबी स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत १५,९९९ रुपये आहे. Axix बँकेच्या कार्डवरून खरेदी केल्यास १ हजार रुपयांची सूट मिळणार आहे.