Ration Card: मोफत रेशनकार्ड धारकांना केंद्र सरकारचा मोठा धक्का! गहू आणि तांदूळ विक्रीवर घातली बंदी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १५ जुन । तुम्हीही केंद्र आणि राज्य सरकारच्या मोफत रेशन योजनेचा लाभ घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. केंद्र सरकारने रेशनबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

नवीन अपडेटनुसार, केंद्र सरकारने ओपन मार्केट सेल स्कीम (OMSS) अंतर्गत केंद्र सरकारकडून राज्य सरकारांना तांदूळ आणि गव्हाची विक्री थांबवली आहे. गरीबांना मोफत अन्नधान्य पुरवणाऱ्या कर्नाटकसह काही राज्यांवर या निर्णयाचा मोठा परिणाम होणार आहे.

कर्नाटक सरकारला आधीच कळवले:

केंद्राकडून या निर्णयाची माहिती कर्नाटक सरकारला आधीच देण्यात आली होती. कर्नाटकने ई-लिलावाशिवाय OMSS अंतर्गत योजनेसाठी जुलै महिन्यासाठी 3,400 रुपये प्रति क्विंटल दराने 13,819 टन तांदूळ मागितला होता.भारतीय खाद्य महामंडळाने (FCI) जारी केलेल्या आदेशानुसार, राज्य सरकारांना OMSS अंतर्गत गहू आणि तांदूळ विक्री बंद करण्यात आली आहे.

अशा राज्यांना स्वस्त धान्य मिळणार:
Economic Times ने दिलेल्या वृत्तानुसार OMSS अंतर्गत, ईशान्येकडील राज्ये, डोंगराळ राज्ये आणि नैसर्गिक आपत्तीमुळे प्रभावित झालेल्या राज्यांसाठी प्रति क्विंटल 3,400 रुपये विक्री सुरू राहील.

बाजारातील किंमती कमी करण्यासाठी आवश्यकतेनुसार FCI OMSS अंतर्गत खाजगी व्यापाऱ्यांना केंद्र सरकारकडून तांदूळ दिला जाऊ शकतो.
12 जून रोजी, केंद्राने 31 मार्च 2024 पर्यंत गव्हावर स्टॉक मर्यादा लागू करताना खुल्या बाजारातील किंमत कमी करण्यासाठी OMSS अंतर्गत तांदूळ-गहू देण्याची घोषणा केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *