2 हजार 392 शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाची प्रतिक्षा

Spread the love

महाराष्ट्र 24 – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – उदगीर .ता. 10 – जीवन भोसले – वाढवणा (बु) राज्यातील महाविकास आघाडी सरकारने महात्मा फुले कर्ज मुक्ती योजना राबिवण्यास सुरूवात केल्याने कर्जदार शेतकर्यांणा दिलासा मिळाला . मात्र नियमीत कर्जाची परतफेड करणार्यासाठी अद्यापही प्रोत्साहनपर अनुदान देण्यात आले नाही . त्यामुळे येथिल 2 हजार 392 शेतकर्यांना त्याची प्रतिक्षा लागून आहे .

वाढवणा बु. य्थिल जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेतुन वाढवणा बू. वाढवणा खु. किन्नी यल्लादेवी , एकुर्का, उमरगा मन्ना, कल्लूर, खेर्डा, या सात सोसायटी चा कारभारआहे, जिल्हा बँरेच्या माध्यमातुन 2 हजार 919 जणांना कर्ज वाटप करण्यात आले होते त्या पेकी 527 शेतकर्यांनी परतफेड न केल्याने थकबाकीदार झाले,
महाविकास अघाडी सरकारने महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 2 लाखापर्यंत कर्ज असलेल्याणा कर्जमाफी देत त्यांच्या खात्यावर रक्कम जमा केली तसेच नियमीत परतफेड करनार्या खातेदारास प्रत्येकी 50 हजार प्रोत्साहन अनुदान देनण्याचे जाहीर केले , 255 जणांना अध्यापही लाभ मिळाला नाही . दरम्यान 2 हजार 392 शेतकर्यानी परतफेड केली आहे. मात्र त्यांना प्रोत्साहन अनुदान अद्याप मिळाले ही, त्यामुळे पेरणी पुर्वी अनुदान मिळेल का ? असा सवाल व्यक्त होत आहे. या वर्षी शेतकरी संकटात आहे , नियमीत कर्जाची परतफेड करतो मात्र शासनाने अद्यापहीअनूदान दिले नाही , पेरनी पुर्वी दिल्यास मदत होईल असे शेतकरी म्हनाले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *