Gold-Silver Price on 19 June 2023: सोनं ‘इतक्या’ रुपयांनी झालं स्वस्त, जाणून घ्या आजचा भाव

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १९ जुन । Gold-Silver Price Today: १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ५९,३१० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ५९,३८० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार चांदी ७२,९८० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७२,९१० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार, मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत ५४,३६८ प्रति १० ग्रॅम आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५९,३१० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५४,३६८ असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५९,३१० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५४,३६८ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५९,३१० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ५४,३६८ आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ५९,३१० रुपये आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *