कोकणात मासे खायला या, बारसूला विरोध करायला नको, नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना ‘फोन’

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १९ जुन । झी मराठी वाहिनीवरील ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नारायण राणे सहभागी झाले होते. गुप्तेंच्या शोमध्ये जादूचा फोन हा प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. या फोनवरुन पाहुणे स्थळ-काळाच्या बंधनाविना अगदी कोणालाही फोन करु शकतात, अशी संकल्पना आहे. नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना ‘काल्पनिक’ फोन करत कार्यक्रमात रंगत आणली. बारसू रिफायनरीला विरोध न करण्याचे आवाहन राणेंनी ठाकरेंना केले.

नारायण राणे काय म्हणाले?

जय महाराष्ट्र उद्धव साहेब, नारायण राणे बोलतोय. तब्येत कशी आहे? बरी आहे ना? कोकणात येऊन तुम्ही रत्नागिरीतील बारसू रिफायनरी प्रकल्पाला विरोध केलात. पण तुम्हाला माहित असेल, तर शिवसेनेच्या स्थापनेपासून कोकणी माणसाची साथ लाभली आहे. कोकणातून आलेल्या माणसांनी शिवसेना वाढवली, किंबहुना आजही वाढवत आहेत, असं नारायण राणे म्हणाले.

बारसू रिफायनरी प्रकल्प कोकणच्या विकासासाठी आवश्यक आहे. त्यामुळे या प्रकल्पाला विरोध नको, सहकार्य करा. तुम्ही बाळासाहेबांचे चिरंजीव आहात. कोकणाने बाळासाहेबांना प्रेम आणि विश्वास दिला. तुम्ही त्यापैकी एक तरी द्या. कोकणात मासे खायला या, पण विरोध करायला नको, असं आवाहन नारायण राणे यांनी केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *