बुलडाणा जिल्ह्यात कृषि निविष्ठा सनियंत्रण कक्षाची स्थापना

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – बुलढाणा – गणेश भड -, दि. 1२ :आपत्ती कृषि विभागातर्फे कृषि निविष्ठाच्या गुणनियंत्रण आणि पुरवठा नियंत्रण करण्याच्या दृष्टीने तालुकास्तरावर भरारी पथकांची स्थापना 16 मे ते 31 जुलै 2020 पर्यत करण्यात आलेली आहे. सदर कक्ष सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेर्पंत कार्यरत राहणार आहे. सदर निविष्ठा पुरवठा आणि त्याअंनुषगाने प्राप्त होणाऱ्या तक्रारी निवारणासाठी खामगांव उपविभाग स्तरावर कृषि निविष्ठा संनियंत्रन कक्षाचा दुरध्वनी क्र. 07263- 253013 आहे. या क्रमांकावर तक्रारी नोंदविता येणार आहे.

तसेच कृषि निविष्ठांच्या गुणनियंत्रण व पुरवठा नियंत्रणाकरीता तालुका स्तरीय तक्रार निवारण समितीही स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये उपविभागीय कृषि अधिकारी अध्यक्ष असून तालुका कृषि अधिकारी सदस्य, महाबीज जिल्हा व्यवस्थापक सदस्य, केविके / विद्यापीठ शास्त्रज्ञ सदस्य व पंचायत समिती कृषि अधिकारी सदस्य सचिव असणार आहे.

शेतकऱ्यांनी तक्रार अर्ज नजीकच्या कृषि अधिकारी, पंचायत समिती कार्यालयात आवश्यक कागदपत्रांसह द्यावा. तालुका कृषि अधिकारी कार्यालयाकडे अर्ज प्राप्त झाल्यास सदर अर्ज तात्काळ कृषि अधिकारी यांचेकडे हस्तांतरीत केल्या जाणार आहे, असे उपविभागीय कृषि अधिकारी, खामगांव यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *