बुलडाणा आयुर्वेद महाविद्यालयाचे कोविड केअर सेंटरसाठी अधिग्रहण

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – बुलढाणा – गणेश भड – :  दि. 1२ :आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अन्वये जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व फैलाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील आनंदीबाई शिक्षण प्रसारक मंडळ आयुर्वेद महाविद्यालय, बुलडाणा व महाविद्यालयातील सर्व कर्मचारी, साहित्यासह विलगीकरणासाठी कोविड केअर सेंटरसाठी अधिग्रहण केले आहे.

सदर अधिग्रहीत केलेले संकुल ज्या वेळेस प्रशासनास आवश्यकता भासेल, त्यापूर्वी महाविद्यालयास कळविण्यात येणार आहे. या आदेशाद्वारे विहीत करण्यात आलेल्या कोणत्याही निर्बंधाची किंवा सदर आदेशाची अवज्ञा करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा संघटना ही भारतीय दंडसंहीता च्या कलम 188 तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 नुसार दंडनीय, कायदेशीर कारवाईस पात्र राहणार आहे, असे जिल्हादंडाधिकारी यांनी आदेशान्वये कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *