महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २५ जुन । अवघ्या चार दिवसांवरच आषाढी वारीचा (Ashadhi wari) सोहळा आला आहे. या सोहळ्यासाठी विठुरायाची पंढरी सज्ज झाली आहे. वारकऱ्यांच्या दिंड्या पंढरपुरात (Pandharpur) दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, आषाढी वारीसाठी दिंड्या पंढरपूरकडे निघाल्या की राज्यात पावसाला सुरुवात होत असते. मात्र, यंदा पावसानं चांगलीच ओढ दिली आहे. त्यामुळं पंढरीकडे जाणारे वारकरी आपल्या विठुरायाला राज्यात लवकर चांगला पाऊस पडू दे असं गाऱ्हाणं मांडत होते. अखेर कालपासून राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे. विठुरायानं आमचं गाऱ्हाणं ऐकलं, वारी सफल झाली अशा भावना वारकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.
वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचं वातावरण
विठुरायाच्या आषाढी सोहळ्यासाठी लाखोंच्या संख्येनं भाविक पंढरीची वाट चालत आहेत. हजारो भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत. बहुतांश वारकरी हा शेतकरी आहे. हे वारकरी जरी वारीसठी पंढरपूरला आले असले तरी त्यांच्या डोक्यात शेतावरील पेरणीची, जनावरांची काळजी घर करुन बसलेली असते. जून महिना संपत येऊनही पाऊस येण्याची चिन्हे नसल्यानं या विठ्ठल भक्तांचा देवाकडे पावसासाठी सातत्यानं धावा सुरु होता. अखेर राज्यातील अनेक भागात पावसाला सुरुवात झाल्यानं भाविकांच्या चेहऱ्यावरील काळजीची जागा आता आनंदाने घेतली आहे. आमच्या देवानं आमचं मागणं ऐकलं आणि पाऊस सुरु झाल्याच्या भावना वारकऱ्यांनी व्यक्त केल्या. आता आषाढी यात्रा आनंदात होणार अशा प्रतिक्रिया भाविकांकडून येऊ लागल्या आहेत.
यावर्षी पावसानं ओढ दिली आहे
यावर्षी राज्यात मान्सून दाखल होण्यास वेळ लागला आहे. दरवर्षी मान्सून जून महिन्याच्या सुरुवातीलाच दाखल होत असतो. मात्र यंदा पावसानं ओढ दिल्यानं बळीराजा चिंतेत होता. मात्र, अखेर राज्याच्या विविध भागात पावसानं (Rain) हजेरी लावली आहे. कुठं हलका ते मध्यम स्वरुपाचा तर कुठे जोरदार पाऊस कोसळत आहे. मुंबईत कालपासून पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. अनेक ठिकाणी पहिल्याच पावसाच मुंबईची तुंबई झाल्याचं पाहायला मिळालं. त्याचबरोबर राज्यातील वाशिम, सोलापूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, पालघर, वसई विरार, कोल्हापूर या भागात पावसानं जोरदार हजेरी लावली. तर काही ठिकाणी नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याचे पाहायला मिळाले.
राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी
राज्याच्या विविध भागात पावसानं (Rain) हजेरी लावली आहे. कुठं हलका ते मध्यम स्वरुपाचा तर कुठे जोरदार पाऊस कोसळत आहे. मुंबईत कालपासून पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. अनेक ठिकाणी पहिल्याच पावसाच मुंबईची तुंबई झाल्याचं पाहायला मिळालं. त्याचबरोबर राज्यातील वाशिम, सोलापूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, पालघर, वसई विरार, कोल्हापूर या भागात पावसानं जोरदार हजेरी लावली.