महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २८ जुन । सिंदखेडराजा: समृद्धी महामार्गावर भरधाव जाणाऱ्या कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार समृद्धी महामार्गावरील पुलाच्या कठड्याला धडकली.या भीषण अपघातात एक जण ठार झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. सदर अपघात आज २७ जून रोजी झाला. सर्व राहणार नाशिक येथील असून एकाचा कुटुंबातील आहे.
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, नाशिक येथील राहणारे बनसोडे कुटुंब आज सकाळी अमरावतीहून एमएच २७ डीए १९२७ या क्रमांकाची कारने नाशिककडे जात होते.दरम्यान सिंदखेड राजा जवळ चॅनल क्रमांक ३३५.९ वर चालकाला डुलकी लागून कारवरील नियंत्रण सुटल्याने कार महामार्गावरील पुलाच्या कठड्याला धडकली. त्यामध्ये नाशिकचे बनसोडे कुटुंब गंभीर जखमी झाले.
कारमधील सुरेश बनसोडे (वय ५०) हे गंभीररीत्या जखमी झाल्याने शासकीय रुग्णालय जालना येथे नेल्यानंतर औषध उपचार सुरू असताना त्याचा मृत झाला. तर दिनेश बनसोडे (वय ४५), सविता बनसोडे (वय ४०), अश्वजीत बनसोडे (वय१३) सर्व गंभीररीत्या जखमी झाले.या अपघाताची माहिती मिळतात क्यू आर व्हीचे कर्मचारी अजय पाटील, अनुदीप पवार, परमेश्वर शिंदे यांनी घटनास्थळी जाऊन अपघातग्रस्तांना बाहेर काढून त्यांना पुढील उपचारासाठी जालना येथे नेले.
जखमींना यासीन शहा व डॉ. बोराडे, चालक दिगंबर शिंदे व प्रवीण राठोड यांनी तत्काळ जालना शासकीय रुग्णालय येथे घेऊन गेले व अपघात ग्रस्त वाहन महामार्ग पोलिस पीएसआय शैलेश पवार पोलिस कर्मचारी नापोकाँ मुकेश जाधव ,प्रवीण राणे व महाराष्ट्र सुरक्षा बलचे जवान .भगवान गायकवाड, अजय पाटील ,श्रीराम महाजन यांनी वाहतूक सुरळीत केली.