महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.४ जुलै । राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर बऱ्याच राजकीय घडामोडी घडत आहेत. अजितदादा सरकारमध्ये सामिल झाल्यानंतर त्यांच्या अभिनंदनाचे काही फ्लेक्सची झळकले आहेत. पण त्यावर शरद पवार यांचे फोटोही झळकले. यापार्श्वभूमीवर माझ्या परवानगीशिवाय फोटो वापरण्यात येऊ नयेत, असा इशारा पवारांनी अजितदादा गटाला दिला आहे. (Dont use my photo without permission Sharad Pawar warning to Ajitdada group)
“माझा फोटो माझ्या परवानगीनेच वापरावा. मी ज्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे, ज्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आहेत. त्या पक्षानेच माझा फोटो वापरावा, अन्य कोणी परवानगीशिवाय फोटो वापरू नये, अस शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, अजित पवारांनी बंड करत आठ आमदारांसह स्वतः उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या प्रकरणामुळं राज्याच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणात खळबळ उडाली होती. पण यानंतर शरद पवारांनी आपला अजितदादांच्या निर्णयाला कुठलाही पाठिंबा नसल्याचं स्पष्ट करत तातडीनं त्यांच्यासह इतर आठ जणांवर ज्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली.