Shinde Thackeray Meets: एकनाथ शिंदे, राज ठाकरे भेटीत नेमकी काय चर्चा झाली? मुख्यमंत्र्यांनीच दिली माहिती

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ८ जुलै । राज्यातील वेगानं घडत असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर भेट झाली. सुरुवातीला ही भेट नेमकी कुठल्या कारणासाठी होत आहे, याबाबत कुठलीही माहिती उपलब्ध झाली नव्हती. पण आता या भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करुन भेटीत काय चर्चा झाली याची माहिती दिली. (CM Eknath Shinde Raj Thackeray Meeting What exactly was discussed CM gave info)

CM शिंदे म्हणाले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज वर्षा निवासस्थानी उपस्थित राहून सदिच्छा भेट घेतली. यावेळी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कर्जाचा प्रश्न तसेच बीडीडी चाळींच्या पुनर्विकासात स्थानिक रहिवाशांचे प्रश्न तसेच सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्याबाबत चर्चा करण्यात आली. या सर्व प्रश्नांवर लवकरात लवकर समाधानकारक तोडगा काढण्यात येईल असं आश्वासन यावेळी आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *