MHADA Lottery 2023 : म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करणाऱ्यांसाठी एक दिवसाची मुदतवाढ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ११ जुलै । म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या ४,०८२ घरांच्या सोडतीसाठी आणखी एक दिवसाची मुदतवाढ देण्यात आली आहे. म्हाडाने यापूर्वी सोमवार, १० जुलैपर्यंतची अंतिम मुदत दिली होती. या कालावधीत, रात्री ९.३० पर्यंत तब्बल १ लाख ३६ हजार ८३९ अर्ज दाखल झाले होते. आता मंडळातर्फे अर्ज सादर करण्यासाठी सुधारित वेळापत्रकानुसार अर्जदारांना आज मंगळवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत कालावधी दिला आहे.

अर्जदारांना अनामत रक्कमेचा ऑनलाइन भरणा मंगळवार रात्री ११.५९ वाजेपर्यंत करता येईल. मुदतवाढीनुसार अर्जदारांना मंगळवार, रात्री ११.५९पर्यंत अनामत रक्कमेचा ऑनलाइन भरणा करता येईल. त्यासह १७ जुलैला दुपारी ३ वाजता सोडतीसाठी प्राप्त अर्जांची प्रारूप यादी म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे.

अर्जदारांना १२ जुलैला संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत आरटीजीएस, एनईएफटी मार्फत अनामत रकमेचा भरणा करता येईल. त्याचप्रमाणे, १९ जुलैला दुपारी ३पर्यंत प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यापासून ऑनलाइन दावे-हरकती दाखल करता येतील.दरम्यान, २४ जुलैला दुपारी ३ वाजता सोडतीसाठी स्वीकृत अर्जांची अंतिम यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *