महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ जुलै । Wi vs Ind 1st Test Playing 11 : भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 सायकलची सुरुवात वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेने करणार आहे. टीम इंडिया वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. तेथे त्याला दोन कसोटी, तीन वनडे आणि पाच टी-20 सामने खेळायचे आहेत.
भारतीय संघ पहिल्या कसोटी मालिकेने सुरुवात करणार आहे. उभय संघांमध्ये 12 ते 16 जुलै दरम्यान पहिला कसोटी सामना खेळवला जाणार आहे. हा सामना डॉमिनिका येथील विंडसर पार्क येथे होणार आहे. या सामन्यापूर्वीही भारतीय कर्णधार रोहित शर्माने अनेक मोठे खुलासे केले आहेत.
युवा यशस्वी जैस्वाल त्याच्यासोबत सलामीची जबाबदारी सांभाळताना दिसणार आहे असे रोहितने सांगितले. त्याचबरोबर टीम इंडिया या सामन्यात दोन फिरकीपटूंसह उतरणार आहे. अशा परिस्थितीत या मोठ्या सामन्यापूर्वी टीम इंडियाचे प्लेइंग 11 जवळपास निश्चित दिसत आहे.
क्रिकेटपटूनेच क्रीडा मंत्र्याला फटकारलं
रोहितने आधीच स्पष्ट केले आहे की तो स्वत: यशस्वी जैस्वालसोबत पहिल्या कसोटीत डावाची सुरुवात करताना दिसणार आहे. त्याचबरोबर शुभमन गिल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसणार आहे. यासह विराट कोहली पुन्हा चौथ्या क्रमांकावर खेळताना दिसणार आहे. विराट अजूनही कसोटी क्रिकेटमध्ये आपल्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये परतण्याचा प्रयत्न करत आहे.
त्याचवेळी नुकताच संघाचा उपकर्णधार झालेला अजिंक्य रहाणे पाचव्या क्रमांकावर येईल. याशिवाय यावेळी इशान किशन यष्टिरक्षक म्हणून पदार्पण करताना दिसणार की केएस भरतला पुन्हा संधी मिळते, हे पाहणे विशेष ठरणार आहे.

जडेजा आणि अश्विन पुन्हा एकत्र दिसणार
या सामन्यात टीम इंडिया दोन फिरकीपटूंसोबत जाणार असल्याचे कर्णधार रोहितने आधीच स्पष्ट केले आहे. अशा परिस्थितीत रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन ही फिरकी जोडी पुन्हा एकदा मैदानात दिसणार आहे. त्याचबरोबर हे दोन खेळाडू संघातील मुख्य अष्टपैलू खेळाडूंचीही भूमिका बजावतील. याशिवाय शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज आणि जयदेव उनाडकट हे संघाचे वेगवान गोलंदाज असतील.
पहिल्या कसोटीसाठी भारताचे Playing 11 : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, इशान किशन (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज आणि जयदेव उनाडकट