महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ जुलै । राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह त्यांच्या काही सहाकारी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची तर राष्ट्रवादीच्या आठ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर आता या नव्या मंत्र्यांना बंगले आणि दालनंही मिळाली आहेत. मात्र, अद्याप खातेवाटप झालेलं नाही. असं असलं तरी मंत्रिमंडळाचा विस्तार न झाल्यामुळे शिवसेनेच्या आमदारांनी अनेकदा जाहीर नाराजीही व्यक्त केलेली आहे. यातच आता पुन्हा एकदा बच्चू कडू यांची नाराजी दिसून आली आहे. बच्चू कडू यांना आमदारांमधील नाराजीबद्दल विचारल्यावर ते म्हणाले, “कोणताही आमदार आस लावून बसलेला नाही. केवळ तुम्हा पत्रकारांना वाटतं की, आमदार आस लावून बसलेत. आम्ही काय पिशवी घेऊन बसलोय का? वाटून टाकायला मंत्रिपद काय भाजीपाला आहे का? मुळात कोणी पिशवी घेऊन बसणार आहे का?”