महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १३ जुलै । नवनवीन तंत्रज्ञानाच्याबाबतीत चीनचा (China) हात कोणीच धरु शकत नाही. अमेरिका आणि युरोपला मागे टाकत चीन तंत्रज्ञानाच्या बाबतीत अनेक शोध लावत आहेत. अलीकडेच चीनच्या एका कंपनीने स्मार्ट टॉयलेट बनवल्याचा दावा केला केला आहे. या टॉयलेटच्या सहाय्याने ह्युमन वेस्टची (मानवी मलनिस्सारण) चाचणी करणे सहज शक्य होणार आहे. कंपनीच्या या दाव्याने टेक्नोलजीच्या विश्वात खळबळ माजली आहे. हे स्मार्ट टॉयलेट नक्की आहे तरी काय? जाणून घेऊया
स्मार्ट टॉयलेट बनवणाऱ्या टीमने असा दावा केला आहे की, यात हायटेक सेन्सर बसवण्यात आले आहेत. यामुळं यूरिन सॅंपलची चाचणी पॅथलॅबप्रमाणेच होऊ शकते. व याचा अहवाल युजर्स त्यांच्या मोबाइल वर किंवा कंपनीच्या अॅपवर पाहू शकणार आहेत. या रिपोर्टच्या आधारे युजर्स त्यांच्या आरोग्याविषयक सल्ला डॉक्टरांकडून घेऊ शकतात.
या आजाराची होऊ शकते चाचणी
स्मार्ट टॉयलेटमुळं लघवीच्या नमुन्याची चाचणी होणार आहे. त्यामुळं हृदयरोगासारख्या आजाराबाबत कळू शकेल. त्याचबरोबर कँन्सर आणि मधुमेहाच्या लक्षणाबाबतही यामुळं आधीच कळू शकेल. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या स्मार्ट टॉयलेटचा वापर घर तसंच सार्वजनिक ठिकाणीही करु शकतो. त्याचा वापर करणे खूपच सोप्पं आहे. तसंच, चाचणीला अहवालदेखील कमी वेळात येतो.
जाणकरांच्या मते, शौचालयामुळं आरोग्यसंबंधी माहिती मिळवण्यास मदत होईल. स्मार्ट टॉयलेट वापरकर्त्यांची सवय न बदलता त्यांचा डेटा गोळा करेल तसंच, या डेटा लीक होणार नाही याचीही काळजी घेतली जाईल.
ऑडिटी सेंट्रल न्यजू वेबसाइटने दिलेल्या अहवालानुसार चीनची राजधानी बिजिंगसह अनेक शहरात हे सार्वजनिक शौचालयात हे स्मार्ट टॉयलेट बसवण्यात आले आहेत. स्मार्ट युरिनल असं त्याचे नाव आहे. याची विशेषता म्हणजे लघवी केल्यानंतर जर कोणाला युरीन टेस्ट करायची असेल तो व्यक्ती ती चाचणी करु शकतो. हायटेक युरीनलमध्ये डिजीटल डिस्प्ले देण्यात आला आहे तसंच, बिल्ड-इन पेमेंटचा पर्यायही देण्यात आला आहे.
अमेरिका युरोपमध्ये स्मार्ट टॉयलेटची चर्चा वाढली
अमेरिकीतील वेगस येथे यंदा आयोजित केलेल्या CES टेक शोमध्ये अनेक हेल्थ गॅझेट्स पाहायला मिळाले होते. तिथेच फ्रान्सच्या एका कंपनीने अशाचप्रकारचा स्मार्ट टॉयलेट लाँच केला होता. ज्यामध्ये महिलांच्या लघवीच्या नमुन्यातून त्या गरोदर आहेत की नाही हे कळू शकणार होते. त्याचबरोबर मासिक पाळीत त्यांनी काय काळजी घ्यावी याचे सल्लेही मिळत होता.