महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १८ जुलै । दोन आठवड्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मोठी फूट पडली आणि अजित पवारांसह 9 आमदारांचा शपथविधी झाला. त्या पाठोपाठच विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी शिंदे गटात केलेला प्रवेश. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर यंदाचे पावसाळी अधिवेशनाची वादळी होईल असा अंदाज वर्तवला जात होता. त्याप्रमाणे पहिल्याच दिवशी त्याचा प्रत्यय आला.
विधानसभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सर्व विरोधकांनी तर विधान परिषदेत नीलम गोऱ्हे यांच्या उपसभापतीपदावर ठाकरे गटाने तीव्र आक्षेप घेतला. त्यामुळे पहिला दिवस वादळी ठरला. पहिल्या दिवसानंतर दुसऱ्या दिवसाचे कामकाज होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विधान परिषदेमध्ये उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यावर ठाकरे गट आक्षेप घेऊन सभागृहाचे कामकाज बंद पाडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर विधान सभेतही गोंधळ होण्याची शक्यता आहे. या दरम्यान आमदार रोहित पवारांसह काही आमदार लक्षवेधी सूचना मांडणार आहेत.
सोमय्या यांच्या व्हिडिओवरुन गोंधळ
भाजप नेते किरीट सोमय्यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित झाला आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी तर विधिमंडळात हे प्रकरण मांडणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे विधिमंडळात आज हे प्रकरण गाजण्याची चिन्हे असून विरोधकांडकून ठोस कारवाईची मागणी करण्यात येत आहे.