महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १८ जुलै । राज्यातील अनेक जिल्ह्यात अद्याप समाधनकारक पावसाची शेतकरी वाट पाहत आहेत. यादरम्यान हवामान विभागाकडून दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्यात बहुतांश भागात येत्या ५ दिवसात मुसळधार पाऊस कोसळेल असा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. या पावसाच्या शक्यतेदरम्यान राज्यात मुंबईसह तब्बल १७ जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्टही जारी करण्यात आला आहे.

राज्यातील काही भागात मान्सूनने दमदार हजेरी लवली मात्र राज्यात अनेक ठिकणी पेरणीपुरता देखील पाऊस झाला नाही. दरम्यान मागील आठवडाभरापासून राज्यातील काही भागात पावसाने उसंत घेतली होती.त्यानंतर आता पुन्हा पावसाचा जोर वाढणार असल्याचं हवामान खात्याने सांगितलं आहे.
⚠️Orange Alerts ⚠️ #Konkan & #Goa and #MadhyaMaharashtra likely to get Very Heavy rainfall for the next 5 days with Heavy to Very heavy with Extremely heavy rainfall on 19th July.
Stay safe!#WeatherAlert #HeavyRainfallAlert @moesgoi @DDNewslive @airnewsalerts @ndmaindia pic.twitter.com/EdsKbhxf4m
— India Meteorological Department (@Indiametdept) July 17, 2023
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात पुढील ४ ते ५ दिवस जोरदार पावसाटी शक्यता आहे. या कालावधीत कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मराठवाड्यातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
तर कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट देण्यात आलेल्या असून जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला. तर विदर्भातही ऑरेंज अलर्ट, पुण्यात मात्र यलो अलर्ट देण्यात आला आहे. घाट परिसरात बुधवारी तुरळक ठिकाणी अतिवृष्टीही होऊ शकते. साताऱ्यात घाट परिसरात बुधवार ते शुक्रवार ऑरेंज अॅलर्ट, तर कोल्हापूर जिल्ह्यात घाट परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.