Gold Price Today: सोने-चांदीचा आजचा भाव काय ?

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २४ जुलै । २०२३ च्या पहिल्या सहामाहीत सोन्या आणि चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळाला तर दुसऱ्या सहामाहीच्या कालावधीत सोन्याची किंमत वेगाने वाढत आहे. फेडरल रिझर्व्हच्या महत्त्वाच्या बैठकीपूर्वी आठवड्याच्या पहिल्या व्यवहार दिवशी MCX (मल्टी कमोडिटी एक्सचेंज) वर बाजारातील सहभागी सावध राहिल्याने सोन्याच्या किमती मागील आठवड्यात किंचित कमी झाल्यानंतर सोमवारच्या सत्राच्या सुरुवातीला स्थिर व्यवहार करत आहेत. याशिवाय चांदीच्या दरांमध्येही घट नोंदवली गेली आहे.

MCX वर सोने स्थिर तर चांदी स्वस्त
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोमवारी सोन्याचा भाव ५९ हजार २४१ रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडला आणि व्यवहार दरम्यान ५९ हजर २१० रुपयांच्या इंट्राडे नीचांकी पातळीवर घसरला. दरम्यान, चांदी ७४ हजार ६९५ रुपये प्रति किलोवर उघडली आणि ७४ हजार ५८५ रुपयांच्या इंट्राडे नीचांकी पातळीवर आली. आगामी फेडरल रिझर्व्हच्या महत्त्वाच्या बैठकीपूर्वी बाजारातील गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतला असल्याने सोन्याच्या किमती मागील आठवड्यात कमी होऊन आज स्थिर व्यवहार करत आहेत.

गेल्या आठवड्यात काही फेड अधिकार्‍यांच्या टिप्पण्या आणि कमकुवत आर्थिक डेटानंतर यंदाच्या बैठकीत फेड दरवाढ चक्राच्या गतीमध्ये कमीची घोषणा करेल असे अपेक्षित आहे.

सोन्या-चांदीचा आजचा भाव काय?
सोमवारी देशांतर्गत बाजारात मौल्यवान धातूंचे वायदे दबावाखाली आले आणि सोने ६० हजार रुपयांच्या जवळ पोहोचले आहे. भारतीय सराफा बाजारातील सोन्या-चांदीच्या दरांबद्दल बोलायचे तर गुडरिटर्नच्या मते मुंबईत २२ कॅरेट १० ग्रॅम सोने ५५ हजार १५० रुपये तर २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा आजचा भाव ६० हजार १६० रुपये आहे. याशिवाय प्रति किलो चांदी ७८ हजार रुपयांवर पोहोचली आहे. अशा स्थितीत सोन्या आणि चांदीच्या दरांनी गेल्या दोन महिन्यात झालेली घसरण जुलै महिन्यात भरून काढली असून ग्राहकांना खरेदीवर जास्त खिसा रिकामा करावा लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *