Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
मेथी, कोथिंबीर, शेपू चे भाव गडगडले - Maharashtra 24

मेथी, कोथिंबीर, शेपू चे भाव गडगडले

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३१ जुलै । कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार नारायणगाव(ता.जुन्नर) या ठिकाणी शनिवारी( दि.२९) कोथिंबीर, मेथी,शेपू च्या जुड्यांची मोठ्या प्रमाणात आवक होऊन बाजारभावात घसरण झाली मुंबईसह इतरत्र मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने कोथिंबीर मेथीची मागणी कमी झाली त्यामुळे व्यापार्यांनी शनिवारी खरेदी केलेल्या कोथिंबीर मेथी शेपूच्या जुड्या बाजारपेठेतच सोडून दिल्याने कोथिंबीर मेथीच्या ५० ते ६० हजार जुड्या बाजार समितीतच पडून होत्या.

शनिवारी उपबाजार नारायणगाव येथे कोथिंबीर, मेथी, शेपू यांची एकूण ३ लाख २५ हजार १०० जुड्यांची आवाक झाली. लिलावात धन्याची १ लाख ४९ हजार १०० जुड्यांची आवक होऊन शंभर जुड्याला किमान ५१ रुपये ते कमाल १८०१ रुपये दर मिळाला, मेथीची १ लाख ६२ हजार ६०० जुड्यांची आवक होऊन शंभर जुड्याला किमान १०१ रुपये तर कमाल ९०१ रुपयाचा भाव मिळाला.शेपूच्या १३ हजार ४०० जुड्यांची आवक होऊन १०० जुड्याला किमान ३०१ तर कमाल १२०१ भाव मिळाला.

दरम्यान, उप बाजारात ८ हजार ७०५ टोमॅटो क्रेट ची आवक होऊन २० किलोच्या एका क्रेटला किमान ६०० ते २ हजार २०५ रुपये भाव मिळाला असल्याचे बाजार समितीचे उपसचिव शरद धोंगडे यांनी सांगितले. उप बाजार समिती नारायणगाव या ठिकाणी येणारी तरकारी, कोथिंबीर , मेथी व भाज्या यांचा लिलाव झाल्यानंतर व्यापारी ते पुढील विक्रीसाठी पुणे,मुंबई सारख्या ठिकाणी पाठवत असतात मुंबई येथे सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे तरकारी बरोबर इतरही भाज्यांची मागणी कमी झाली आहे त्यामुळे बाजारभावात घसरण झाली आहे.
दरम्यान,बाजार समितीत लिलावात ज्या मेथी,कोथिंबीर चांगला बाजार मिळाला आहे तो चांगल्या प्रतीचा असून प्रतवारी केलेला होता,त्यामुळे यापुढे शेतकऱ्यांनी बाजारपेठेत कोथिंबीर, मेथी विक्रीसाठी आणताना जुडा व्यवस्थित बांधून प्रतवारी करून आणावी असे आवाहन बाजार समितीचे सभापती संजय काळे व उपसभापती प्रकाश ताजणे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *