पिंपरी चिंचवड शहरातील कुदळदवाडी भागात भंगार माफियांचा सुळसुळाट

Spread the love

महिन्याला ५००/६०० कोटी रुपये भंगार खरेदी विक्री सुरू, भंगार माफियांविरोधात कारवाई व्हावी

सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांची मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवड शहरातील मोशी कुदळदवाडी चिखली तळवडे या भागातील भंगार गोदाम गल्ली बोळात सुरू असून, त्या ठिकाणी पिंपरी चिंचवड, चाकण, मावळ, हिंजवडी.येथील एम.आय.डी.सीमधून भंगार गोळा करून विल्हेवाट लावण्यात येत असून, करोडो रुपये किमतीचे भंगार गोळा केले जात असून, पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना हाताशी धरून एमआयडीसीमधून भंगार चोरीचे प्रकार मोठ्या प्रमाणावर सुरू असून, भंगार मालाची खरेदी विक्री भंगार गोळा करून कुदळदवाडी भागात आणून भंगार खरेदी विक्री करून भंगार विल्हेवाट लावण्यात येत असून, त्या संदर्भात पिंपरी-चिंचवड पोलिस व पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन गप्प का, असा सवाल येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी उपस्थित केला आहे. तसेच अशा भंगारमाफियांवर ताबडतोब कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ह्यांना लेखी पत्राद्वारे मागणी करण्यात आली असून तसेच ईमेल करुन तक्रार दाखल केली आहे.

भंगार व्यवसायिक करोडो रुपये किमतीचे भंगार विल्हेवाट लावत असून, त्या पिंपरी-चिंचवड पोलिस तसेच महानगरपालिका प्रशासन कारवाई करण्यासाठी कोणाची वाट पाहत आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील सामान्य नागरिकांना हा प्रश्न पडला असून, शहरातील मध्यवर्तीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर भंगार गोदाम कुदळदवाडी चिखली-तळवडे-मोशी भागात असून, सुमारे १५०० छोटे भंगार व्यवसायिक असून, ७००/८०० मोठे भंगार गोदाम या परिसरात असून, त्याठिकाणी भंगार गोळा करणारे कामगार उत्तर प्रदेश बिहार पश्चिम बंगाल भागातील असून, अतिरेकी कारवाया वाढल्या असून, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्ती भंगार गोळा करून कुदळदवाडी चिखली तळवडे मोशी भागात गोदाम घेऊन भंगार माल त्या ठिकाणी साठवून ठेवत असून भंगार कंपनीमधून चोरून तसेच शहरातील इतर भागातून गोळा करून कुदळदवाडी भागात विल्हेवाट लावण्यात येत आहे. त्या भंगार मालाची खरेदी विक्री करून महिन्याला ५००/६०० कोटी रुपये भंगार माफिया कमवत असून, त्या संदर्भात पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तांनी ताबडतोब दखल घेऊन भंगार माफियांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात यावी.

त्या संदर्भात पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त व पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तांनी चिखली मोशी येथील कुदळदवाडी तळवडे भागातील भंगार माफियांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करून चिखली मोशी कुदळदवाडी तळवडे भागातील भंगार गोदाम जप्त करून भंगार माल ताब्यात घेऊन कडक कारवाई करण्यात यावी. महाराष्ट्र राज्य सरकारचा महसूल बुडत असून, त्या संदर्भात अंमलबजावणी करण्यात यावी कुदळदवाडी या ठिकाणी भंगार व्यवसायिक गोदाम मध्ये मोठ्या प्रमाणावर गाड्यांचे स्पेअर पार्ट. इलेक्ट्रॉनिक वस्तू . तांबे पितळ. ॲल्युमिनियम. लोखंड,.रददी पेपर व पुठ्ठे इत्यादी वस्तू तसेच कंपनीतील इतर माल रबर.गाडयाचे टायर वगैरे वस्तू भंगार गोळा करून विल्हेवाट लावण्यात येत असून, काही गोदामात करोडो रुपये किमतीचे माल साठवून ठेवला आहे. घातपात होण्याची दाट शक्यता आहे गेल्या काही वर्षांत आग लागून दुर्घटना घडली होती त्या संदर्भात पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने काही उपाययोजना करण्यात आली नाही. तसेच दखल घेतली नाही गेल्या महिन्यात पुण्यात अतिरेकी अटक करण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर चिखली मोशी कुदळदवाडी तळवडे भागात कोंबिंग ऑपरेशन राबवून भंगार गोदाम मालासहित पोलिसांनी ताब्यात घेऊन पंचनामा करून फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे. कुदळदवाडी भागात भटकळ बंधू आशयाला होते. त्या संदर्भात पोलिस तपासात निष्पन्न झाले होते पश्चिम बंगाल व आसाम बिहार उत्तर प्रदेश परप्रांतिय भंगार व्यवसायिक मोठ्या प्रमाणावर कुदळदवाडी भागात वास्तव्य करून भंगार गोळा करून विल्हेवाट लावण्यात येत असून त्या संदर्भात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *