महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १६ ऑगस्ट । डोळे हा शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि शरीराचा सर्वात नाजूक भाग देखील आहे. तेव्हा डोळ्यांची काळजी घेणे फार महत्वाचे ठरते. उन्हापासून डोळ्यांचे रक्षण करण्यासाठी लोक चष्मा वापरतात. चष्मा घातल्याने डोळ्यांचे धूळ आणि घाणीपासूनही संरक्षण होते. पण तुम्हाला माहिती आहे का की डोळ्यांना बाह्य संरक्षण देण्यासोबतच अंतर्गत संरक्षण देखील आवश्यक आहे. तेव्हा डोळ्यांची काळजी कशी घ्यावी ते जाणून घेऊ या.
आपण जे काही खातो त्याचा आपल्या डोळ्यांच्या आरोग्यावरही परिणाम होतो. अनेक वेळा नकळत आपण अनेक प्रकारचे चुकीचे पदार्थ खातो, जे डोळ्यांना हानी पोहोचवतात आणि शरीरासाठीही हानिकारक असतात. या गोष्टींचे दीर्घकाळ सेवन केल्याने डोळ्यांची दृष्टी कमी होण्यासोबतच डोळ्यांशी संबंधित आजारांचा धोका वाढतो. चला तर अशा पदार्थांबद्दल जाणून घेऊया, जे डोळ्यांना हानी पोहोचवतात. या पदार्थांबद्दल जाणून घेण्यासाठी शारदा क्लिनिकचे डॉक्टर केपी सरदाना याचं मत जाणून घेऊया.
ब्रेड आणि पास्ता
ब्रेड आणि पास्ता दोन्ही मैद्यापासून बनवलेले असतात, जे शरीरासाठी हानिकारक असतात. तसेच डोळ्यांनाही नुकसान पोहोचवतात. त्यामध्ये असलेले कार्बोहायड्रेट्स सहज पचतात. त्यामुळे रक्तातील साखर झपाट्याने वाढते आणि डोळ्यांना इजा होपोचते. मैद्याऐवजी गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या गोष्टींचा आहारात समावेश करा.
तळलेले पदार्थ
तळलेले पदार्थ डोळ्यांच्या दृष्टीवरही परिणाम करतात. त्यामध्ये चरबीचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल वाढते आणि त्यांचे सेवन केल्याने वजनही झपाट्याने वाढते. तळलेले पदार्थ खाल्ल्याने हृदयविकार, स्ट्रोक आणि टाईप 2 मधुमेह होण्याची शक्यता वाढते.
प्रक्रिया केलेले मांस
प्रक्रिया केलेले मांस शरीरासाठी हानिकारक असते आणि त्याचा दृष्टीवरही परिणाम होतो. प्रक्रिया केलेले मांस खाल्ल्याने उच्च रक्तदाब होतो. याच्या सेवनामुळे दृष्टी कमकुवत होण्यासोबतच डोळ्याच्या दृष्टीवरही त्याचा परिणाम होतो. यामध्ये असलेले सोडियम शरीरासाठी हानिकारक आहे. (Health)
स्वीट ड्रिंक्स
गोड पेये शरीराला हानी पोहोचवतात आणि अनेक आजारांचा धोकाही वाढवतात. हे प्यायल्याने लठ्ठपणा वाढतो आणि मधुमेह होण्याची शक्यताही वाढते. त्यांच्या वापरामुळे डोळ्यांशी संबंधित आजार जसे की रेटिनोपॅथी होऊ शकतात. (Eye Care)
डबाबंद पदार्थ
डबाबंद पदार्थ डोळ्यांसाठी हानिकारक असतात. त्यामध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे रक्तदाब वाढण्यासोबतच वजनही वेगाने वाढते. याच्या वापरामुळे डोळ्यांशी संबंधित आजारांचा धोका अनेक पटींनी वाढतो. डोळे निरोगी ठेवण्यासाठी ताजी फळे आणि भाज्या खा.
डोळे निरोगी ठेवण्यासाठी बदाम, सफरचंद, केळी, संत्री, द्राक्षे, अक्रोड, मासे आणि हिरव्या भाज्यांचा आहारात समावेश करा.