महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि.१५ मे ।। आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेचा काऊंटडाऊन सुरू झाला आहे. या स्पर्धेला येत्या १ जूनपासून प्रारंभ होणार आहे. तर स्पर्धेतील फायनलचा सामना २९ जून रोजी रंगणार आहे. ही स्पर्धा वेस्टइंडीज आणि अमेरिकेत खेळवली जाणार आहे. या स्पर्धेतील ओपनिंगचा सामना अमेरिकेततील डलासमध्ये होणार असून स्पर्धेतील सेमीफायनल आणि फायनलचे सामना वेस्टइंडीजमध्ये आयोजित करण्यात येणार आहे.
स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच आयसीसीने वाढवलं टेन्शन
स्पर्धा सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक असताना आयसीसीने सर्वच संघाचं टेन्शन वाढवलं आहे. आयसीसी टी -२० वर्ल्डकप स्पर्धा ही २ वर्षातून एकदा येते. त्यामुळे सामन्याचा पूर्ण निकाल यावा आयसीसीच्या स्पर्धेतील महत्वाच्या सामन्यांमध्ये राखीव दिवसाची सोय केली जाते. आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतही राखीव दिवस असेल. मात्र आयसीसीने अचानक मोठा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेतील सेमीफायनलच्या पहिल्या सामन्यासाठी राखीव दिवस असणार आहे. तर दुसऱ्या सेमीफायनलसाठी राखीव दिवस नसणार आहे.
काय आहे कारण?
दुसऱ्या सेमीफायनलचा सामना २७ जून रोजी खेळवला जाणार आहे. जर यादिवशी पाऊस पडला आणि सामना होऊ शकला नाही, तर राखीव दिवस २८ जूनला ठेवावा लागेल. म्हणजे हा सामना जिंकणाऱ्या संघाला लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे २९ जून रोजी फायनल खेळण्यासाठी मैदानावर यावं लागेल.
India will play the 2nd Semi Final in Guyana if they qualify for the Semis.
– There's no Reserve Day for the 2nd Semi. pic.twitter.com/b13Cwl9PBI
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 15, 2024
सामना रद्द झाल्यास काय?
या स्पर्धेतील सेमीफायनलच्या सामन्यांबद्दल बोलायचं झालं, तर पहिला सामना स्थानिक वेळेनुसार रात्री ८ वाजता खेळला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी ६ वाजता सुरु होईल. तर दुसऱ्या सेमीफायनलचा सामना स्थानिक वेळेनुसार सकाळी १०: ३० वाजता आणि भारतीय वेळेनुसार रात्री ८:३० वाजता सुरु होणार आहे. जर सामन्यावेळी पाऊस पडला,तर त्याच दिवशी ४ मिनिटांचा वेळ वाढवून दिला जाईल. मात्र तरीही सामना न झाल्यास हा सामना रद्द केला जाईल. हा सामना रद्द झाल्यास जो संघ सुपर ८ मध्ये मजबूत स्थितीत असेल, तो संघ फायनलमध्ये प्रवेश करेल.