महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि.१६ मे ।। भारतीय हवामान खात्याने यासंदर्भातील माहिती दिली आहे. देशात एल निनोचा प्रभाव कमकुवत होत असून ला निनाची स्थिती सक्रिय होत आहे. यामुळे यंदा चांगल्या मान्सूनसाठी (Monsoon Weather) अनुकूल स्थिती असल्याचं हवामान खात्याने सांगितलं आहे.
दुसरी चांगली गोष्ट म्हणजे, ला निना बरोबरच हिंद महासागरातही कमी दाबाचा पट्टा तयार होतोय. हवेच्या दाबाची ही परिस्थितीही चांगल्या मान्सूनसाठी अनुकूल आहे. परिणामी यावेळी नैऋत्य मान्सून वेळेआधीच (Monsoon 2024 News) अंदमान-निकोबारमध्ये दाखल होईल.
आयएमडीच्या अंदाजानुसार, यंदा १९ मे रोजी मान्सून अंदमान निकोबारमध्ये दाखल होऊ शकतो. त्यानंतर पुढच्या १० दिवसांत तो केरळमध्ये येऊ शकतो. ३१ मेपर्यंत मान्सून संपूर्ण केरळला व्यापण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील ४ दिवसांत तो महाराष्ट्रात दाखल होईल.
यंदा मान्सून वेळेआधीच केरळात दाखल होण्याचा अंदाज आहे. मागील ५ वर्षांची आकडेवारी बघितली तर, २०१९ मध्ये ८ जून रोजी मान्सून केरळात दाखल झाला होता. २०२० मध्ये १ जूनला मान्सून केरळात आा. २०२१ मध्ये ३ जून रोजी मान्सूनचे केरळात आगमन झाले. २०२२ – २९ मे, २०२३ – ८ जून आणि २०२४ मध्ये ३१ मेपर्यंत मान्सून केरळात दाखल होण्याचा अंदाज आहे.