महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि.१८ मे ।। ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम अभिनेता गुरुचरण सिंह बेपत्ता झाला होता. २५ दिवसांनंतर बेपत्ता असलेला गुरुचरण सिंह काल संध्याकाळी घरी परतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुचरण सिंह काल अर्थात १७ मे रोजी घरी परतला आहे. गुरुचरण सिंग घरी परतल्यानंतर पोलिसांनी कोर्टात त्याचा जबाब नोंदवला आहे. पोलिसांसमोर दिलेल्या जबाबात गुरुचरण सिंहने तो आध्यात्मिक प्रवासाला निघून गेले होता, असं सांगितलं.
रिपोर्टनुसार, गुरुचरण सिंग स्वतः घरी परतले आहेत. गुरुचरण सिंग घरी परतल्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी केली आहे. आध्यात्मिक प्रवासासाठी घरापासून दूर गेल्याचे गुरुचरण सिंग यांनी पोलिसांना सांगितलं आहे. गुरूचरण सिंग यांनी पोलिसांना माहिती दिली की, अमृतसर, लुधियानासह अनेक वेगवेगळ्या शहरांत मी गेले २५ दिवस होतो. शहरांतील वेगवेगळ्या गुरूद्वारांमध्येच मी राहायला होतो. काही दिवसांनंतर मला आपल्याला घरी जायला हवं, अशी जाणीव झाली म्हणून मी घरी परतलो.
https://www.instagram.com/sodhi_gcs/?utm_source=ig_embed&ig_rid=443d49f4-4d8d-42e4-b648-deec8f1611b6
गुरुचरण सिंगच्या वडिलांनी तो बेपत्ता झाल्याची तक्रार दिल्ली पोलिसांत दाखल केली होती. दिल्ली पोलीस गुरुचरण सिंहच्या शोधात होते. गुरुचरण सिंग २२ एप्रिल रोजी दिल्लीहून मुंबईला जाण्यासाठी एअरपोर्टवर गेला. पण तो मुंबईला न जाता बेपत्ता झाला होता. पोलिस तपासात मिळालेल्या माहितीनुसार, गुरुचरण सिंगचा फोन २४ एप्रिलपर्यंत चालू होता आणि त्याने अनेक बँक व्यवहारही केले होते. तसेच, तपासादरम्यान पोलिसांना कळले की गुरुचरण सिंग आर्थिक संकटातून जात होते आणि त्यांची अनेक बँक खातीही होती.