महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १९ जुन ।। Kane Williamson steps down as New Zealand captain : न्यूझीलंडच्या क्रिकेट संघाने सोमवारी रात्री पापुआ न्यू गिनी संघावर मात करीत टी-२० विश्वकरंडकाचा आपला शेवट गोड केला, मात्र त्यांचे या स्पर्धेतील आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले. न्यूझीलंडच्या सुमार कामगिरीचे पडसाद कर्णधार केन विल्यमसन याच्यावरही उमटले आहेत.
आता संघाची खराब कामगिरी लक्षात घेऊन कर्णधार विल्यमसननेही एक मोठा निर्णय घेतला आहे, ज्यामध्ये त्याने न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाच्या खेळाडूंचा सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट सोडण्याचा निर्णय घेतला आहे आणि कर्णधारपदही सोडले.(Kane Williamson Latest News Marathi)
टी-२० प्रकाराचा पुढील विश्वकरंडक २०२६ मध्ये होणार आहे. न्यूझीलंडचा डावखुरा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट यानेही हा आपला अखेरचा टी-२० विश्वकरंडक असेल अशी घोषणा केली. आता केन विल्यमसनही बोल्टच्याच पावलावर पाऊल ठेवले आहे.
????BREAKING NEWS????
Kane Williamson has declined a New Zealand central contract for the 2024-25 season. pic.twitter.com/PjxVPAfAXG
— Cricbuzz (@cricbuzz) June 19, 2024
न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने जारी केलेल्या निवेदनात त्याने सांगितले की, खेळाडूंचा सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट सोडण्यासोबतच केन विल्यमसनने मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमधील संघाचे कर्णधारपदही सोडले आहे.
आपल्या निर्णयाबाबत केन विल्यमसन म्हणाला की, न्यूझीलंडसाठी मी सर्व फॉरमॅटमध्ये खेळलो यांचा मला आनंद आहे आणि मी भविष्यातही योगदान देत राहीन. पण आता मी केंद्रीय करार स्वीकारण्यास असमर्थ आहे. न्यूझीलंडसाठी खेळणे अजूनही माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. मात्र, क्रिकेटबाहेरील माझे जीवन खूप बदलले आहे. ज्यात मला आता माझ्या कुटुंबासोबत अधिक वेळ घालवायचा आहे.(Kane Williamson quits as New Zealand’s white-ball captain)
वातावरण व खेळपट्टीचा फरक
केन विल्यमसन याने न्यूझीलंडच्या टी-२० विश्वकरंडकातील कामगिरीबाबत मत व्यक्त करताना म्हटले की, आम्हाला या स्पर्धेची सुरुवात छान करायची होती, पण येथील वातावरण व खेळपट्टीशी समन्वय साधल्या जाणाऱ्या वेस्ट इंडीज व अफगाणिस्तान या दोन तगड्या संघांविरुद्ध आमची लढत होती. या दोन्ही संघांविरुद्ध आम्हाला अपयश आले. अखेरच्या दोन लढतींमध्ये समाधानकारक कामगिरी केली, पण एकूणच काय तर आमच्यासाठी ही स्पर्धा वेदनादायी होती.
आव्हानात्मक अन् शिकण्यासारखे
केन विल्यमसन अमेरिका व वेस्ट इंडीजमधील खेळपट्टी व वातावरण याबाबत म्हणाला की, आमच्या संघातील खेळाडूंसाठी येथील वातावरण व खेळपट्टी आव्हानात्मक होती. फलंदाज धावा करण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करीत होते, पण मार्ग काही सापडत नव्हता, पण यामधून खूप काही शिकायला मिळाले. आता हा अनुभव घेऊन पुढे जाऊ.(Kane Williamson News)