महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २९ जुन ।। आधीच महागाईच्या भडक्यात होरपळून निघालेल्या सर्वसामान्यांना आणखी एक मोठा झटका बसला. रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेलनंतर आता वोडाफोन-आयडियाने देखील मोबाइल रिचार्जचे प्लॅन वाढवले आहेत. कंपनीने शुक्रवारी नवीन प्लॅनची घोषणा केली. येत्या ४ जुलैपासून हे नवीन रिचार्ज प्लॅन लागू होणार आहेत.
Jio Recharge Plans: Jio ग्राहकांना तगडा झटका, रिचार्ज प्लान तब्बल २५ टक्क्यांनी महागले; एका महिन्यासाठी आता किती पैसे मोजावे लागणार?
प्राप्त माहितीनुसार, वोडाफोन-आयडिया कंपनीने मोबाईल रिचार्ज प्लॅन्स १० ते २१ टक्के वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे ग्राहकांना रिचार्जसाठी आता जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार आहे. अनलिमिटेड व्हॉईस प्लॅनबद्दल बोलायचे झाले तर, २८ दिवसांसाठी ग्राहकांना आधी १७९ रुपये खर्च करावे लागत होते.
आता हाच रिचार्ज प्लॅन आता १९९ रुपयांना झाला आहे. तर ४५९ रुपयांचा ८४ दिवसांचा रिचार्ज प्लॅन ५०९ रुपयांना झाला आहे. याशिवाय ३६५ दिवसांसाठीचा प्लान आधी १७९९ रुपयांना मिळत होता. तो तब्बल २०० रुपयांनी वाढून १९९९ रुपये इतका झाला आहे.
दुसरीकडे २६९ आणि २९९ रुपयांचा २८ दिवसांच्या रिचार्ज प्लॅनची देखील किंमत वाढली आहे. यापुढे २६९ रुपयांचा प्लॅन २९९ रुपयांना मिळणार आहे. तर २९९ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनची किमत ५० रुपयांनी वाढून ३४९ रुपये इतकी झाली आहे. ३१९ रुपयांचा १ महिन्याचा रिचार्ज प्लॅन ३७९ रुपयांचा झाला आहे.
डेटा ॲड-ऑन प्लॅनबद्दल बोलायचे झाल्यास, १९ रुपयांचा प्लॅन २२ रुपये आणि ३९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन आता ४८ रुपयांचा झाला आहे. या प्लॅनची वैधता अनुक्रमे १ आणि ३ दिवसांची आहे. वोडाफोन-आयडियाने सांगितलं की, ४ जीबी डेटाची सेवा उत्तम देण्याबरोबरच ५ जीबी डेटा सेवा देण्यासाठी पुढच्या काही महिन्यांमध्ये मोठ्या गुंतवणुकची योजना कंपनी करत आहे. एन्ट्री लेव्हल युजर्सना लक्षात घेऊन प्लॅनमध्ये किरकोळ वाढ केल्याचं कंपनीने स्पष्ट केलं.