Devendra Fadnavis : वीज कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी ; मूळ वेतन, भत्त्यांमध्ये मोठी वाढ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ८ जुलै ।। ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखाली महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी या वीज कंपन्यांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्यात आली आहे. मूळ वेतनात 19 टक्के व सर्व भत्त्यांमध्ये 25 टक्के वाढ देण्यात येत असल्याची माहिती, उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आज सह्याद्री अतिथी गृह येथे वीज कंपन्यांचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.

या बैठकीस ऊर्जा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवआभा शुक्ला, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी. अनबलगन, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार या तिन्ही कंपन्याचे वरिष्ठ अधिकारी-कर्मचारी, तसेच संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, तिन्ही वीज कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 19 टक्के व सर्व भत्त्या मध्ये 25 टक्के वाढ देण्याचं मान्य केलं आहे. तसंच सहाय्यकांना Probationary कालावधी करीता ५००० रुपयांची वाढ आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांना मिळणारा 500 रुपये भत्ता 1000 रुपये करण्यात आला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *