महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १८ जुलै ।। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील मुख्य गाभाऱ्यात प्रवेश करणाऱ्या पुजारी, भाविक व अन्य व्यक्तींची आता लेखी नोंद घेतली जाणार असुन. सुरक्षेच्या कारणाने पोलिसांनी याबाबत सुचना केल्याने मंदीर संस्थानने हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे गाभाऱ्यात होणाऱ्या मनमानी प्रवेशाला आळा बसणार असुन चोख व्यवस्था बाळगण्यात येणार आहे. सिंहासन पुजा व अभिषेक वेळ वगळता इतर वेळी मंदीर प्रवेश करणाऱ्याच्याही नोंदी घेतल्या जाणार आहेत. शिवाय तुळजाभवानी देवीचा पुरातन व नियमित दागिने, खजिना उघडताना पोलीसांना कळविणे सक्तीचे आसणार आहे. याबाबतचे पत्रक मंदीर संस्थानचे तहसीलदार तथा व्यवस्थापक सोमनाथ माळी – वाडकर यांनी काढले आहे.