फॉर्म १६ मिळाला नसेल तर बँकांची मदत घ्या! पाहा कुठून आणि कसा डाऊनलोड करता येईल?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १८ जुलै ।। आयकर विवरण पत्र (आयटीआर) दाखल करण्यासाठी फॉर्म-१६ हवा असतो. तुम्हाला कंपनीने फॉर्म-१६ वेळेत दिला नसेल तर तुमच्या बँकेच्या वेबसाइटवरून फॉर्म-१६ ए डाऊनलोड करता येतो.

फॉर्म-१६ मध्ये कर्मचाऱ्याच्या वेतनातून कापण्यात आलेल्या टीडीएसचे विवरण असते. जास्तीचा आयकर कापला गेला असेल, तर तो परत मिळण्यासाठी हे टीडीएस प्रमाणपत्र आवश्यक असते. ते उपलब्ध नसल्यास बँकेच्या वेबसाइटवरून फॉर्म-१६ ए डाऊनलोड करता येऊ शकते. स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय), एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँक यांच्या वेबसाइटवर तो उपलब्ध आहे.
असा फाॅर्म १६ डाऊनलोड करा…

एसबीआय
वेबसाईटवर आपल्या खात्यात लॉग-इन करा.
‘माय सर्टिफिकेट्स’ पर्यायावर जाऊन ‘ई-सर्व्हिसेस’चा पर्याय निवडा.
‘इंटरेस्ट सर्टिफिकेट ऑन डिपॉझिट अकाउंट्स’वर क्लिक करा.
वित्त वर्ष निवडून सबमिट करा. ‘फॉर्म-१६ ए’ची पीडीएफ डाऊनलोड करा.

एचडीएफडीसी
एचडीएफसी बँकेची वेबसाइट https://netbanking.hdfcbank.com/netbanking/ वर लॉग-इन करा.
‘इन्क्वायर’वर जाऊन ‘टीडीएस इन्क्वायरी’वर क्लिक करावे.
वित्त वर्ष निवडीनंतर टीडीएस प्रमाणपत्र डाउनलोड करू शकाल.

आयसीआयसीआय
वेबसाइट www.icicibank.com वर जाऊन लॉग-इन करा.
‘टॅक्स सेंटर’वर ‘पेमेंट्स अँड ट्रान्सफर’ निवडा.
पेजवर ‘टीडीएस सर्टिफिकेट’वर क्लिक करा.
पॅन कार्ड तपशील भरा. टीडीएस प्रमाणपत्राची पीडीएफ डाऊनलोड करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *