Sharad Pawar : “…अन् माझा खिसा कधी कापला गेला, मलाही कळलं नाही”; शरद पवारांनी सांगितला भन्नाट किस्सा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २८ जुलै ।। Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे नेहमी त्यांच्या राजकीय जीवनातील किस्से आणि प्रसंग सांगत असतात. अशातच त्यांनी आता त्यांचा खिसा कापण्यासंदर्भातला एका भन्नाट किस्सा सांगितला आहे. त्यांनी हा किस्सा सांगताच उपस्थितांमध्ये जोरदार हशाही पिकला. शरद पवार हे रविवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्येष्ठ समाजसेवक मोतीराम राठोड यांच्या जीवनावर आधारीत पुस्तक प्रकाशन सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी बोलताना त्यांनी हा किस्सा सांगितला.

नेमकं काय म्हणाले शरद पवार?
“काही वर्षांपूर्वी मी चाळीसगावमध्ये एका अधिवेशनासाठी गेलो होतो. त्यावेळी आयोजकांनी मला सांगितले की यावेळीच्या अधिवेशनाचं वैशिष्ट म्हणजे, यंदा या भागातील सर्व गुन्हेगार याठिकाणी एकत्र जमले आहेत. मी त्यांना गमतीने विचारलं की या गुन्हेगारांचं असं काय वैशिष्ट आहे? ते म्हणाले, तुम्हाला हे वैशिष्ट बघायचं असेल तर ते या अधिवेशनाच्या ठिकाणीच बघायला मिळेल”, असं शरद पवार म्हणाले, असं शरद पवार म्हणाले.

“…अन् माझा खिसा कधी कापला गेला, मलाही कळलं नाही”
पुढे बोलताना त्यांनी सांगितले, “मी अधिवेशनाच्या ठिकाणी पोहोचलो, तेव्हा त्यांनी मला तिथल्या गुन्हेगारांची ओळख करून दिली. अमुक व्यक्ती खिशा कापतात, तमुक व्यक्ती हा गुन्हा करतात, वगैरे असं वैशिष्ट त्यांनी मला सांगतिले. मी त्यांना विचारलं की हे खिसा कापतात का? ते म्हणाले हो, मग ज्याचा खिसा कापला जातो, त्यांना कळत नाही का? तेव्हा ते मला म्हणाले की तुमच्या खिशात हात घाला, मी खिशात हात घातला तेव्हा हात सरळ खाली गेला. माझा खिसा कधी कापला मला कळलंच नाही. मुळात हे स्किल समाजातील काही घटकांमध्ये परिस्थितीमुळे आलं ”, असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *