बांगलादेशी हिंदू भारताच्या सीमेवर; पाण्यात उभे राहून जय श्री रामचे नारे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १० ऑगस्ट ।। बांगलादेशमध्ये हिंदूंवरील अत्याचार वाढले आहेत. तेथील मुस्लिमांनी शेख हसीना यांचे सरकार जाताच आता हिंदू कुटुंबियांवर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे दहशतीत असलेले हजारो हिंदू कुटुंबे भारतात येण्यासाठी सीमेवर येऊन ठेपले आहेत. यामुळे बीएसएफ सावध झाली असून भारतात प्रवेश मिळविण्यासाठी बांगलादेशी हिंदू पाण्यात उभे राहून जय श्री रामचे नारे देत आहेत.

भारत बांगलादेश सीमेवरून भारतात आधीच हजारो मुस्लिमांनी घुसखोरी केली आहे. हे घुसखोर पश्चिम बंगालमध्येच नाहीतर तर अगदी मुंबई, नवी मुंबईतही सापडलेले आहेत. नवी मुंबईत तर गेल्या वर्षी एका हॉटेलमध्ये या घुसखोरांची पार्टी रंगली होती. त्यावर धाड टाकली गेली होती. केंद्र सरकारही या घुसखोरीमुळे चिंतेत असताना आता बांगलादेशातील हिंसाचारामुळे आणखी एक संकट ओढवले आहे.

हजारोंच्या संख्येने तिथे अल्पसंख्यांक असलेला हिंदू समाज भारत -बांगलादेश सीमेवर आला आहे. बंगालच्या कुचबिहारच्या सीतालकुचीमध्ये एका जलाशयात हे हिंदू उभे राहिले आहेत. बीएसएफने त्यांना भारतात प्रवेश करण्यापासून अडविले असून प्रवेश देण्यासाठी ते बीएसएफला विनंती करत आहेत.

सीमेची सुरक्षा असल्याने बीएसएफ देखील अलर्ट मोडवर आहे. आतापर्यंतचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असलेला हा सर्वात मोठा ग्रुप असल्याचे बीएसएफने म्हटले आहे. यापैकी काही लोक भारत माता की जय, जय श्री रामच्या घोषणा देत आहेत.
बांगलादेशातील रंगपूर जिल्ह्यातील दोई खावा आणि गेंदुगुरी गावातील हे लोक आहेत. बीएसएफने त्यांना त्यांच्या गावी परत जाण्यास सांगितले आहे. परंतू ते ऐकायला तयार नाहीत. अल्पसंख्यांकावरील हल्ल्यांमुळे अमेरिकेनेही चिंता व्यक्त केली आहे. युएनकडेही हा विषय चर्चिला गेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *