Monkeypox: हवेमार्फत पसरतोय मंकीपॉक्सचा व्हायरस? पाहा किती वेगळा आहे हा संसर्ग

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ११ सप्टेंबर ।। देशात मंकीपॉक्सचा एक रूग्ण आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी मंकीपॉक्स या संसर्गाला WHO ने ग्लोबल इमेरजेंसी म्हणून घोषित केलं आहे. अशातच आता लोकांच्या मनात या संसर्गाची भीती निर्माण झाली आहे. यावेळी एमपॉक्स हा हवेमार्फत पसरतो का असा प्रश्नही लोकांच्या मनात घर करू लागला आहे. यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनने दिलेल्या अवहवालानुसार, मंकीपॉक्स हवेतून पसरत नाही. ज्यावेळी संसर्ग असलेल्या व्यक्तीच्या त्वचेशी संपर्क आला तर ही समस्या जाणवू शकते.

हवेतून पसरत नाही एमपॉक्स
मंकीपॉक्सचं जगभरातील थैमान पाहता यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (CDC) ने अहवाल दिला की मंकीपॉक्सचा विषाणू हवेतून सहज पसरत नाही. दरम्यान WHO च्या अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार, विविध परिस्थितीमध्ये उद्रेकादरम्यान एमपॉक्स कसा पसरतो, यावर अधिक शोध घेतला जातोय. एमपॉक्सची मुख्य लक्षणं ही तुमच्या त्वचेवर पुरळ येऊ लागतात. हे फोट मोठे होऊन दोन ते चार आठवडे टिकतात. शिवाय यांच्या लक्षणांमध्ये ताप, डोकेदुखी, अंगदुखी, घशामध्ये खवखव अशा समस्याही यावेळी दिसून येऊ लागतात.

कोरोना आणि मंकीपॉक्समध्ये काय फरक?
कोरोनाने तब्बल २ वर्ष थैमान घातलं होतं. यावेळी कोरोनापासून बचाव करण्यासाठी ज्या पद्धतीने खबरदारी घेण्यात येत होती त्याचप्रमाणे मंकीपॉक्स टाळण्यासाठी सरकारने खास मार्गदर्शक तत्त्वं जारी केली आहेत. दरम्यान हे दोन्ही संसर्ग सारखेच असल्याचा लोकांचा समज आहे. मात्र असं नाहीये.

मंकीपॉक्स विरूद्ध कोरोना
दोन्ही संसर्गाचे विषाणू हे एकमेकांपासून खूप वेगळे असून कोरोनाचा व्हायरस SARS-COV-2 होता तर मंकीपॉक्सचा व्हायरस Poxviridae फॅमिलीतील ऑर्थोपॉक्स व्हायरस आहे. Variola Virus देखील याचाच एक भाग आहे. त्यामुळे हे दोन्ही विषाणू वेगळे आहेत.

या दोन्ही संसर्गाची लक्षणं
सुरुवातील या दोन्हीची लक्षणं सामान्य दिसून येऊ शकतात. मात्र हे दोन्ही एकमेकांशी वेगळे आहेत. मंकीपॉक्समध्ये कोणती लक्षणं दिसून येतात ते आपण पाहूयात

जास्त ताप येणं

त्वचेवर पूरळ येणं

शरीरात गाठी होणं

डोकेदुखी

स्नायूंमध्ये वेदना होणं

थकवा येणं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *