YouTube AI Detection Tools : युट्युबर्ससाठी आनंदाची बातमी ! कंपनीने आणलं कमालीचं टुल,एकदा बघाच

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ११ सप्टेंबर ।। Artificial Intelligence Tool in Youtube : आपल्या आवडत्या कलाकारांच्या नकली आवाजात किंवा चेहऱ्यावर तयार केलेले चुकीचे कॉन्टेंट आता युट्युबवर कमी पाहायला मिळतील. कारण युट्युब कंपनी क्रिएटर्ससाठी खास असे नवीन AI शस्त्र आणत आहे.

या नव्या टूल्समुळे क्रिएटर्स त्यांच्या आवाज आणि चेहऱ्याचा चुकीच्या वापरापासून संरक्षण करू शकणार आहेत. युट्युबवर कॉपीराइटेड मटेरियलचा चुकीने वापर होऊ नये म्हणून कठोर धोरणे आधीच आणली आहेत. आता त्यापुढे एक पाऊल पुढे जाऊन कृत्रिम बुद्धिमत्तेने तयार केलेले नकली आवाज आणि व्हिडिओ ओळखण्यासाठी विशेष टूल्स आणली जात आहेत.

यातला पहिला टूल म्हणजे ‘सिंथेटिक सिंगिंग आयडी टूल’. हे टूल क्रिएटरच्या आवाजाची हुबेहूब नक्कल करणाऱ्या AI-जनरेटेड गाण्यांना ओळखेल. यामुळे क्रिएटर्स अशा चुकीच्या कॉन्टेंटवर लगेच कारवाई करू शकणार आहेत.

दुसरा टूल विशेषत: कलाकार, खेळाडू, संगीतकार यांसारख्या सार्वजनिक व्यक्तींसाठी आहे. हे टूल त्यांच्या चेहऱ्यावर तयार केलेले डीपफेक व्हिडिओ ओळखेल. यामुळे अशा चुकीच्या व्हिडिओमुळे होणारी बदनामी आणि गैरसमज टाळता येणार आहेत.

या नव्या AI टूल्सचा वापर करताना कोणताही गैरसोय होणार नाही याचीही काळजी युट्युब घेत आहे. चुकीच्या विषयांवर किंवा धोरणाचं उल्लंघन करणाऱ्या गोष्टींसाठी या टूल्सचा वापर होणार नाही याची खबरदारी घेतली जाणार आहे.

इतकेच नाही तर क्रिएटर्सची माहिती थर्ड पार्टीकडून चोरण्याचा प्रयत्न केला जात असेल तर त्यालाही युट्युब रोखणार आहे.

या नव्या उपक्रमामुळे युट्युबवर अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह वातावरण तयार होण्यास मदत मिळणार आहे. त्यामुळे आता तुमच्या आवडत्या क्रिएटर्सच्या खऱ्या आवाजात आणि खऱ्या स्वरूपातच त्यांचे कॉन्टेंट तुम्हाला पाहायला मिळतील, यात शंका नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *