Honda Activa EV: सर्वात लोकप्रिय स्कूटर चे इलेक्ट्रिक मॉडेल लाँच, जाणून घ्या काय आहे खास? किमंत किती असेल?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.१ डिसेंबर ।। भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या मागणीला प्रतिसाद देत, होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडिया ने आपला पहिला इलेक्ट्रिक स्कूटर Activa e आणि QC1 लाँच केला आहे. एका भव्य इव्हेंटमध्ये या दोन्ही स्कूटर्सचे अनावरण करण्यात आले. Activa e मध्ये स्वॅपेबल बॅटरी सेटअप आहे, तर QC1 मध्ये फिक्स बॅटरी सेटअप देण्यात आले आहे.


डिझाइन आणि लुक:
होंडा Activa e ला आधुनिक आणि आकर्षक डिझाइन देण्यात आली आहे. जरी याचा फॉर्मफॅक्टर पेट्रोल मॉडेलसारखाच असला, तरी याचे LED हेडलॅम्प, टर्न इंडिकेटर्स, आणि डे टाइम रनिंग लाइट्स (DRL) याला वेगळा लूक देतात. लांब सीट आणि छोट्या फ्लोअरबोर्डसह, स्कूटरच्या मागील बाजूस “ACTIVA e” ची स्टायलिश बॅजिंग आहे.

बॅटरी आणि रेंज:
Activa e मध्ये 1.5 kWh क्षमतेच्या दोन स्वॅपेबल बॅटरी देण्यात आल्या आहेत, ज्यामुळे एका चार्जमध्ये 102 किमी पर्यंतची रेंज मिळते. याचा इलेक्ट्रिक मोटर 4.2 kW (5.6 bhp) चा आउटपुट देतो, जो जास्तीत जास्त 6.0 kW (8 bhp) पर्यंत वाढवता येतो. यामध्ये तीन राइडिंग मोड्स (स्टँडर्ड, स्पोर्ट, आणि इकॉन) आहेत.

Honda QC1: भविष्यातील स्वस्त उपाय
QC1 स्कूटर लुक्समध्ये Activa e सारखाच असला तरी त्याचे काही खास वैशिष्ट्ये वेगळे आहेत. फिक्स बॅटरी सेटअप आणि 1.5 kWh बॅटरीसह येतो. ज्याची रेंज एका चार्जींगमध्ये QC1 80 किमी पर्यंतची आहे.

टेक्नोलॉजी आणि फीचर्स:
QC1 मध्ये 5 इंचाचा LCD पॅनल आहे, जो राइडिंगची महत्त्वाची माहिती दाखवतो. अंडर-सीट स्टोरेज, USB टाइप-C सॉकेट, आणि इन-विल मोटर याला अधिक आकर्षक बनवतात.

Honda Activa EV update
महिंद्रातर्फे दोन इलेक्ट्रिक मोटारी सादर, नावीन्यपूर्णता अन् डिझाइनचे नवे मापदंड

विक्री आणि बाजारपेठा
Activa e आणि QC1 स्कूटर्सची विक्री सुरुवातीला दिल्ली, मुंबई, आणि बेंगळुरू मध्ये होणार आहे. त्यानंतर हळूहळू देशभरात इतर शहरांमध्येही लाँच होणार आहे.

दर आणि बुकिंग:
या स्कूटर्सची किंमत 2025 च्या जानेवारीत जाहीर होणार आहे, त्याच वेळी याची अधिकृत बुकिंग सुरू होईल. Activa e आणि QC1 हे होंडाचे 12वे आणि 13वे जागतिक इलेक्ट्रिक वाहन आहेत. यामुळे होंडाने इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रात आपले स्थान अधिक मजबूत केले आहे. अंदाचे 1 लाख ते १ लाख २० हजारपर्यंत स्कूटर्सची किंमत असेल.

पाच रंगांचे पर्याय उपलब्ध-
हार्डवेअरबद्दल बोलायचे झाल्यास, यात 12-इंच अलॉय व्हील देण्यात आले आहेत, जे टेलिस्कोपिक फोर्क्स आणि ड्युअल स्प्रिंग्सने सुसज्ज आहेत. तर उत्तम ब्रेकिंगसाठी, डिस्क-ड्रम कॉम्बिनेशन दिसेल. ग्राहकांना होंडा ॲक्टिव्हा ई. पाच रंगांचे पर्याय उपलब्ध असतील. यामध्ये पर्ल शॅलो ब्लू, पर्ल मिस्टी व्हाइट, पर्ल सेरेनिटी ब्लू, मॅट फॉगी सिल्व्हर मेटॅलिक आणि पर्ल इग्नियस ब्लॅक यांचा समावेश आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *