महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२० डिसेंबर ।। ऑस्ट्रेलियाने बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांसाठीच्या संघातून सलामीवीर नॅथन मॅकस्विनीला वगळले आहे. पर्थमधील मालिकेतील सलामीच्या सामन्यात पदार्पण करणाऱ्या मॅकस्विनीने आतापर्यंत तीन कसोटी सामन्यांमध्ये १०,०, ३९,१०, ९ आणि ४ अशी खेळी केली आहे. त्याच्या जागी संघात न्यू साउथ वेल्सचा सलामीवीर १९ वर्षीय सॅम कोन्स्टासचा ( Sam Konstas ) समावेश केला गेला आहे. डेव्हिड वॉर्नरच्या निवृत्तीनंतर कोन्स्टास त्याची जागा घेईल अशी चर्चा रंगली होती, परंतु संघ व्यवस्थापनाने भारताविरुद्धच्या मालिकेत मॅकस्विनीवर विश्वास दाखवला.
कोन्स्टासने मागील महिन्यात भारत अ विरुद्धच्या सराव सामन्यात नाबाद ७३ धावा केल्या होत्या आणि त्यानंतर पंतप्रधान एकादश संघासाठी गुलाबी चेंडूच्या सराव सामन्यात १०७ धावांची खेळी केली होती. त्याने या महिन्याच्या सुरुवातीला शेफिल्ड शिल्डमध्ये न्यू साउथ वेल्ससाठी वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८८ धावा केल्या होत्या, तसेच बिग बॅश लीगमध्ये तीन दिवसांपूर्वी सिडनी थंडरसाठी २७ चेंडूत ५६ धावा केल्या होत्या. तो बिग बॅश लीगमध्ये अर्धशतक झळकावणारा युवा फलंदाज ठरला आहे.
कोन्स्टासने पदार्पण केल्यास तो ऑस्ट्रेलियाच्या मागील ७० वर्षांच्या कसोटी इतिहासातील सर्वात युवा पदार्पणवीर ठरेल. Border-Gavaskar Trophy त सध्या भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात १-१ अशी बरोबरी आहे. तिसरा सामना ड्रॉ राहिला आहे आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये जागा पक्की करण्यासाठी दोन्ही संघांना उर्वरित दोन लढती जिंकणे आवश्यक आहे. त्याशिवाय तीन वर्षांनंतर झाय रिचर्डसन ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघात परतला आहे. २०२१-२२ च्या अॅशेस मालिकेनंतर तो संघाबाहेर होता.
https://twitter.com/cricketcomau/status/1869962074396516439?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1869962074396516439%7Ctwgr%5E05cadd7c2f97db2e464a131c278819facf2a6e2d%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.esakal.com%2Fkrida%2Fcricket%2Faustralia-added-young-sam-konstas-15-player-squad-for-the-final-two-tests-vs-indian-jhye-richardson-scott-boland-svg87
जोश हेझलवूला तिसऱ्या कसोटीत पुन्हा दुखापतीने ग्रासले आणि त्यामुळे त्याला मालिकेतून माघार घ्यावी लागली आहे. सीन एबॉटही संघात परतला आहे आणि बियू वेबस्टर यालाही १५ जणांमध्ये पुन्हा संधी दिली गेली आहे.
ऑस्ट्रेलियाचा संघ – पॅट कमिन्स, ट्रॅव्हिस हेड, स्टीव्ह स्मिथ, सीन एबॉट, स्कॉट बोलंड, अॅलेक्स केरी, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, सॅम कोन्स्टास, मार्नस लाबुशेन, नॅथन लायन, मिचेल मार्श, झाय रिचर्डसन, मिचेल स्टार्कस बियू वेबस्टर.
भारताचा संघ – रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, यशस्वी जैस्वाल, लोकेश राहुल, अभिमन्यू ईश्वरन, देवदत्त पडिक्कल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत, सर्फराज खान, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर.