Winter Digestion: हिवाळ्यात बद्धकोष्ठतता राहील दूर ; फक्त ‘या’ दोन पदार्थांचे करा सेवन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२० डिसेंबर ।। हिवाळ्यात पोटाशी संबंधित समस्या वाढतात. या दिवसांमध्ये आपण तेलकट पदार्थ खातो आणि शारीरिक हालचालीही कठीण होतात. यामुळे पचनक्रिया मंदावते. याशिवाय शरीरात पाण्याची कमतरता देखील असते, त्यामुळे पचनक्रिया मंदावते.

त्यामुळे लोकांना पोट साफ करणे कठीण होते आणि लोकांना बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. जर तुम्हाला हिवाळ्यात बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर पुढील दोन पदार्थांचे सेवन करू शकता.

भिजवलेले खजूर
तज्ज्ञांच्या मते भिजवलेले खजूर खाल्ल्याने पोट साफ होते आणि बद्धकोष्ठतेची समस्या देखील दूर राहते. खजूरमध्ये भरपूर फायबर असते, ज्यामुळे पचनक्रिया सुरळीत रहाते. आतड्यांचे कार्य सुधारते आणि शरीराला मल पास करण्यास उत्तेजित करते. यासाठी रोज रात्री 3 ते 4 खजूर पाण्यात भिजवा. या खजूरांना बारीक वाटून घ्या आणि सकाळी रिकाम्या पोटी सेवन करावे.

भरपुर पाणी प्यावे
पोट साफ करण्याचा दुसरा सर्वात सोपा उपाय म्हणजे भरपुर पाणी पिणे. हिवाळ्यात आपल्याला तहान कमी लागते, जेव्हा आपल्या शरीरात पाण्याची कमतरता असते तेव्हा कोलनमधून जास्तीचे पाणी शोषले जाते, ज्यामुळे मल कठीण होते आणि पोट साफ करणे कठीण होते.

शरीराला हायड्रेट ठेवल्यास आतड्यांवर ताण पडणार नाही आणि तुम्ही नैसर्गिकरित्या पोट साफ करू शकता. त्यामुळे दिवसभर पुरेसे पाणी प्यावे. सकाळी उठल्याबरोबर एक ग्लास कोमट पाणी पिणे आरोग्यदायी ठरते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *