महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२६ डिसेंबर ।।
मेष – आपण केलेले सुकृत्य आज पुण्याला येईल. गुरुदेव दत्त उपासना विशेष फलदायी राहणार आहे. संततीकडून सुवर्ता मिळतील. शेअर्स मधून मिळालेला धनलाभ योग्य कामासाठी विनियोग होईल.
वृषभ – बागायती व्यवसाय मधून फायदा आहे. घराच्या खरेदी विक्री मधून नफा संभवतो आहे. कला क्षेत्रामधील घोडदौड आज फळाला जाईल. सुख दारी असा दिवस आहे.
मिथून – भावंडांचे सुख मिळेल. प्रॉपर्टीचे व्यवहार असतील तर आज ते सुकर पार पडतील. वक्तृत्व ही कला आहे आणि आज ती आपली बहरेल.असा योग दिसतो आहे.
कर्क – पाहुण्यांची उठ बस घरी राहील. जुन्या आठवणींमध्ये मन रमेल. आज कुठेही विनाकारण जामीन राहू नका. आपल्या साधेपणाचा फायदा इतर कोणी घेणार नाही याची काळजी घ्या.
सिंह – एक वेगळा आत्मविश्वास आपला द्विगुणित होईल. स्वतःची महत्त्वाकांक्षा पणाला लावून कार्यक्षेत्रामध्ये यश मिळवून याला. सर्वांचे कल्याण यांतच आपलेही अशी भावना मनामध्ये राहील.
कन्या – विनाकारण खर्च वाढतील. कधीकधी पैसे खर्च झाले याचा खेद नसतो तर हिशोब लागत नाही त्याचे वाईट वाटते. असाच आजचा दिवस असेल.खर्चाचा ताळमेळ न साधल्यामुळे अस्वस्थता निर्माण होईल.
तुळ – प्रेमामध्ये समोरच्याचे काय म्हणणे आहे हे आज कान उघडे ठेवून ऐकावे लागेल. झालेल्या गोष्टींविषयी कदाचित मागावी लागली तर क्षमा मागा. पण नातेसंबंध जपण्याचा आज प्रयत्न करा. दिवसाचे लाभ मिळणार आहेत.
वृश्चिक – समाजकारण आणि राजकारणामध्ये यश मिळेल. मोठ्या बैठका आणि गाठीभेटी पार पडतील. संयमाने कामे करावी लागतील.
धनु – दत्त उपासना आज फलदायी ठरणार आहे. आपल्या धर्माची पताका दूर ठिकाणी आपल्याकडून लावली जाईल. तीर्थयात्रा घडतील. सद्गुरु भेटीची एक विशेष पर्वणी आज आपल्याला लाभणार आहे.
मकर – कष्टाला मर्यादा राहणार नाही, असा आजचा दिवस राहील. बोलून कोणाशी वाईटपणा घेऊ नका. भ्रष्टाचार लाचलुचपत तत्सम गोष्टीमधून फायदा मिळवण्याच्या नादात कुठेतरी अडकण्याची शक्यता आहे.
कुंभ- कोर्टाचे निकाल मनाप्रमाणे लागतील. नियतीचा कौल आज तुम्ही मान्य कराल. जोडीदाराबरोबर प्रेमाच्या गुजगोष्टी होतील. दिवस आनंदी आहे.
मीन- कनिष्ठ आणि वरिष्ठ दोघांना संभाळून घेण्याचा आजचा दिवस आहे. साधेपणामुळे साध्या साध्या गोष्टींच्या संधी सुद्धा गमावण्याचे योग आहे. तब्येतीच्या तक्रारी डोके वर काढतील. काळजी घ्यावी.