व्हिसा शुल्कात वाढ, यूकेचा प्रवास महागणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। मंगळवार दि. २५ मार्च ।। येत्या एप्रिलपासून यूकेमध्ये शिकायला जाणे किंवा प्रवास करणे हिंदुस्थानी लोकांसाठी महाग होणार आहे. 19 मार्च 2025 रोजी यूके सरकारने स्टुडंड, व्हिजिटर्स व्हिसा तसेच इलेक्ट्रॉनिक टॅव्हेल ऑथोरायझेशन शुल्कात वाढ करण्याची घोषणा केली. 9 एप्रिल 2025 पासून नवे व्हिसा शुल्क लागू होतील. यूकेमध्ये प्रवेशासाठी व्हिसाची गरज असते. व्हिसा मिळवण्यासाठी शुल्क भरावे लागते. या शुल्कात आता यूके सरकारने 10 टक्के वाढ केली आहे. म्हणजेच व्हिसा शुल्क 149 डॉलरवरून 164 डॉलर एवढे होईल, तर इलेक्ट्रॉनिक टॅव्हेल ऑथोरायझेशन (ईटीए) 12 डॉलरवरून 20 डॉलर एवढे वाढले आहे. ईटीएचे नवे शुल्क येत्या 2 एप्रिलपासून लागू होईल.

जगभरातील टेक कंपन्यांचा कर्मचारी कपातीचा ट्रेंड अद्याप सुरू आहे. अमेरिकन टेक दिग्गज आयबीएम कंपनी आपल्या 9 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार आहे. ही कंपनी न्यूयॉर्क येथील एक बहुराष्ट्रीय टेक्नोलॉजी कंपनी आहे. तसेच ती 170 हून अधिक देशांमध्ये कार्यरत आहे. आयबीएम कंपनी क्लाउड क्लासिक ऑपरेशनमधील मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची योजना आखत आहे. कंपनी नेमके किती कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार आहे, याची आकडेवारी अद्याप जारी केली नसली तरी हा आकडा 9 हजारांहून अधिक असणार आहे. आयबीएम कंपनीने काही कर्मचाऱ्यांना आधीच कामावरून काढले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *