आशियातील सर्वात मोठी ट्यूलिप गार्डन उद्या होणार खुली

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। मंगळवार दि. २५ मार्च ।। जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर शहरात असलेले आशियातील सर्वात मोठे ट्यूलिप गार्डन, या वर्षी 26 मार्चपासून सर्वसामान्यांसाठी खुले केले जाईल. दरवर्षी लाखो पर्यटक या बागेचे सौंदर्य पाहण्यासाठी आणि ट्यूलिप महोत्सवाचा भाग होण्यासाठी येथे येतात. ‘इंदिरा गांधी मेमोरियल ट्यूलिप गार्डन’ असे नाव असलेली ही सुंदर बाग श्रीनगरमधील दल सरोवराच्या काठावर आहे. जगातील सर्वात सुंदर बागांपैकी ती एक मानली जाते. येथे हजारो प्रकारचे रंगीबेरंगी ट्यूलिप फुले उमलतात.

ही बाग आशियातील सर्वात मोठी ट्यूलिप गार्डन आहे जी 30 हेक्टरमध्ये पसरलेली आहे. येथे 17 लाखांहून अधिक आणि 75 हून जास्त प्रकारची ट्यूलिप फुले पाहायला मिळतील. ही बाग दल सरोवराजवळ आहे जिथून झबरवान टेकड्यांचे मनमोहक द़ृश्य पाहायला मिळते. आजुबाजूला बर्फाळ शिखरे आणि तलावाचे अद्भुत द़ृश्य दिसते. दरवर्षी मार्च-एप्रिलमध्ये ट्यूलिप महोत्सव साजरा केला जातो. या महोत्सवात पर्यटकांसाठी अनेक उपक्रम आणि कार्यक्रमदेखील येथे आयोजित केले जातात. ट्यूलिप व्यतिरिक्त, डॅफोडिल्स, हायसिंथ्स, नार्सिसस आणि इतर परदेशी फुलांच्या अनेक जाती येथे पाहायला मिळतात. श्रीनगरचे ट्यूलिप गार्डन दरवर्षी फक्त 1 महिन्यासाठी पर्यटकांना बघण्यासाठी उघडतात. कारण ट्यूलिप फुलांचे आयुष्य खूपच कमी असते. हे उद्यान सहसा मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून ते एप्रिलच्या शेवटपर्यंत उघडे असते. जर तुम्हाला ट्यूलिपची फुले पूर्ण बहरलेली पहायची असतील तर मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून ते एप्रिलच्या पहिल्या-दुसर्‍या आठवड्यापर्यंत तिथे जाणे चांगले, असे तज्ज्ञ सांगतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *