EPFO चा मोठा निर्णय! ऑटो क्लेम सेटलमेंटची मर्यादा ते पीएफ ट्रान्सफरच्या या ५ नियमांत मोठा बदल

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ९ एप्रिल ।। प्रत्येक संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचे पीएफ अकाउंट हे असतेच. ईपीएफओमधून तुम्ही काही परिस्थितीत पीएफ काढू शकतात.पीएफ काढण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी ईपीएफओने पाऊले उचलली आहे. त्यामुळे पीएफ काढण्याच्या प्रक्रियेत बदल करण्यात आले आहेत.१ एप्रिलपासून हे नवीन नियम लागू झाले आहे.

ऑटो क्लेमसाठी सेटलमेंट मर्यादा वाढवली (Auto Claim Settlement)
तुम्हाला अॅडव्हान्स केल्मच्या ऑटो मोड प्रोसेसिंगसाठी रक्कमेची मर्यादा वाढवण्यात आली आहे. ही मर्यादा १ लाखांपर्यंत करण्यात आली आहे. वैद्यकीय परिस्थिती किंवा शिक्षण, घर घेणे, लग्नासाठी तुम्ही अॅडव्हान्स ऑटो सेटलमेंटद्वारे काढू शकतात.६० टक्के दावे आता ऑटो मोडमध्ये करण्यात येणार आहे. यानंतर तीन दिवसांत तुम्हाला पैसे मिळतात.

कर्मचाऱ्यांच्या माहितीत बदल (Changes In Employees Details)
आता जर तुम्हाला तुमची माहिती बदलायची असेल तर ही प्रक्रिया अधिक सोपी झाली आहे. तुम्ही आधार लिंकवरुन तुम्ही थेट ईपीएफओच्या माहितीमध्ये बदल करु शकतात.

पीएफ ट्रान्सफर (PF Transfer Process)
आता पीएफ ट्रान्सफर करण्यासाठी नियोक्त्याकडून आधार आणि यूएएन व्हेरिफिकेशन करण्याची गरज नाही. फक्त १० टक्के दाव्यांसाठी नियोक्त्यांकडून प्रमाणित करणे आवश्यक आहे.

कॅन्सल चेकची आवश्यकता नाही
आता तुम्हाला पीएफ क्लेमच्या फॉर्मसोबत कॅन्सल चेकची गरज नाही.ही प्रक्रिया आता काढून टाकण्यात आली आहे.

अपात्र दाव्यांसाठी मार्गदर्शन
जर एखाद्या सदस्याचा पीएफ क्लेम रिजेक्ट झाला तर त्याबाबत ईपीएफओकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. पीएफ क्लेमसाठी पात्रता वैगरे याबाबत माहिती दिली जाणार आहे.

PF चे पैसे यूपीआयद्वारे काढता येणार
आता लवकरच पीएफचे पैसे यूपीआय आणि एटीएमद्वारे काढता येणार आहेत. यासाठी ईपीएफओकडून माहिती देण्यात आली आहे. मे- जून महिन्यात ही प्रोसेस सुरु केली जाईल. यामध्ये तुम्ही १ लाखांपर्यंत पैसे काढू शकतात.यामुळे पीएफ क्लेम करणे अधिक सोपे होणार आहे. याचसोबत तुम्ही एटीएममधूनही पीएफचे पैसे काढू शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *