Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
Local Train Accident : लोकल प्रवासादरम्यान तीन वर्षातील मृतांची आकडेवारी चिंताजनक - Maharashtra 24

Local Train Accident : लोकल प्रवासादरम्यान तीन वर्षातील मृतांची आकडेवारी चिंताजनक

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १० जून ।। रेल्वे अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून यामधील मृतांची आणि जखमींची संख्याही मोठी आहे. गेल्या तीन वर्षात मुंबई लोकलच्या प्रवासादरम्यान ७,५६० प्रवासी मृत्यूमुखी पडले, तर ७,२९३ जण जखमी झाले आहेत. गर्दीचे अयशस्वी नियोजन, मर्यादित लोकलफेऱ्या आणि थांबे, वातानुकूलित लोकलचा सामान्य लोकलवरील ताण, रुळांभोवती कुंपणाचा अभाव, यांमुळे अपघात घडत आहेत.

ठाणे-कल्याण मार्गावर सर्वाधिक मृत्यू
मध्य रेल्वेवर सर्वाधिक अपघाती मृत्यू ठाणे ते कल्याण या मार्गावर झाले आहेत. या मार्गावर झालेल्या अपघातांतील जखमींची संख्याही सर्वाधिक आहे. मुंबई लोहमार्ग पोलिसांनी (जीआरपी) माहिती अधिकारात दिलेल्या माहितीमधून ही बाब समोर आली.

सन २०२४ मध्ये मध्य रेल्वेवर धावत्या लोकलमधून पडून ३८७ प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला. ७८८ जण जखमी झाले. या कालावधीत कल्याण जीआरपीमध्ये धावत्या लोकलमधून पडून ११६ जणांचा मृत्यू, तर १५७ जण जखमी झाले. डोंबिवली जीआरपीमध्ये ३९ मृत्यू आणि ९६ जखमींची नोंद आहे. ठाणे जीआरपीमध्ये ६८ मृत्यू आणि १०७ जण जखमी झाल्याची नोंद आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर हे प्रमाण सुमारे ५८ टक्के आहे.

मध्य रेल्वेवर सन २०२२ मध्ये झालेल्या अपघातांत १,५८५ प्रवाशांचा मृत्यू आणि १,१५३ जण जखमी झाले. गेल्या वर्षी यामध्ये किरकोळ घट झाली. १,५३३ प्रवाशांचा मृत्यू झाला. रेल्वे अपघातांतील जखमींच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. सन २०२४ मध्ये १,६५५ प्रवासी जखमी झाले

अंबरनाथ, बदलापूरकरांना रेल्वे धरते गृहीत, खच्चून गर्दी, चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती…मध्य रेल्वेच्या नियोजनशून्य कारभाराचा प्रवाशांना फटका

मुंबई लोकलमधील अपघाताची कारणे
रुळ ओलांडणे, धावत्या रेल्वेतून पडणे, फलाट आणि रेल्वेच्या पोकळीत पडणे, आत्महत्या, हृदयविकाराचा झटका, विजेच्या धक्क्याने मृत्यू, आजारपण

सन २०२४ मधील अपघाती (मृत्यू/जखमी)
ठाणे – जखमी – ६८, मृत्यू – १०७
कल्याण – जखमी – ११६, मृत्यू – १५७
डोंबिवली – जखमी – ३९, मृत्यू – ९६

मध्य रेल्वेवरील संख्या – (मृत्यू/जखमी)
२०२४ – मृत्यू – १५३३, जखमी – १६५५
२०२३ – मृत्यू – १६५०, जखमी – १४६६
२०२२ – मृत्यू – १५८५, जखमी – ११५३
एकूण – मृत्यू – ४७६८, जखमी – ४२७४

पश्चिम रेल्वेवरील संख्या – (मृत्यू/जखमी)
२०२४ – मृत्यू – ९३५, जखमी – १,०४२
२०२३ – मृत्यू – ९४०, जखमी – ९७५
२०२२ – मृत्यू – ९२२, जखमी – १००२
एकूण – जखमी – २७९२, मृत्यू – ३०१९

– (स्त्रोत मुंबई लोहमार्ग पोलिस, माहिती अधिकार)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *