महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १४ जुलै ।। मादागास्करजवळील समुद्रात एक प्रचंड खजिना सापडला आहे. भारताचेही या खजिन्याशी खूप खास नातं असल्याच बोल जात. पण आता हा खजिना कोणाला मिळेल यावर वाद सुरू झाला आहे. मादागास्करमध्ये समुद्रात पडलेल्या 300 वर्षे जुन्या जहाजाचे अवशेष सापडले आहेत. या जहाजाच्या अवशेषात 101 दशलक्ष पौंड म्हणजेच सुमारे 11.74 अब्ज रुपये किमतीचा अमूल्य खजिना खोजकरतांना सापडला आहे.
1721 मध्ये मादागास्करजवळ समुद्री चाच्यांनी केलेल्या मोठ्या हल्ल्यात हे जहाज बुडालं होतं. हे पोर्तुगीज जहाज भारतातील गोव्याहून माल घेऊन लिस्बनला जात होतं. त्यानंतर समुद्री चाच्यांनी त्यावर हल्ला केला. त्यावेळी गोव्यावर पोर्तुगालचं राज्य होतं. आता जहाजाच्या अवशेषाच्या ठिकाणाहून 3300 हून अधिक कलाकृती बाहेर काढण्यात आल्या आहेत, ज्या भारतीय असल्याच बोलं जात आहे.
पेट्यामध्ये सोनं, मोती आणि मूर्तींनी भरलेल्या
यामध्ये धार्मिक मूर्ती, सोन्याचे पिंड, मोती आणि खजिन्याने भरलेल्या पेट्यांचा सापडल्या आहेत. त्यावेळी हा खजिना भारतातून पोर्तुगालला नेला जात होता, तर भारताचा या खजिन्यावर काही अधिकार असू शकतो का? हा खजिना शोधणाऱ्यांना दिला जाईल की जहाज बुडालेल्या देशाला दिला जाईल? यावर चर्चा रंगली आहे.
भारताला तो कसा मिळेल?
भारताला हा खजिना भारतातून लुटलेली सांस्कृतिक संपत्ती असल्याचे सिद्ध झाल्यास भारताला हा खजिना मिळतो शकतो. तसंच पोर्तुगालदेखील हा खजिना मिळवण्याची विनंती करू शकतो. हा खजिना त्यांच्या सरकारी जहाजात होता, म्हणून ती त्यांची मालमत्ता आहे आणि त्यांना तो मिळाला पाहिजे. तर मादागास्कर दावा करू शकतो की जिथे खजिना सापडला तो त्यांचा जलक्षेत्र आहे. म्हणून, त्यांना तो शोधण्याचा आणि जतन करण्याचा अधिकार आहे. पण, आंतरराष्ट्रीय नियमांनुसार खजिन्याचा वाटा समुद्राच्या खोलीतून बाहेर काढणाऱ्या शोधकांना दिला जातो. आता यावर काय निर्णय होतो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.