महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २८ जुलै ।। श्रावणातील प्रत्येक श्रावणी सोमवारनिमित्त वेरूळ (ता. खुलताबाद) येथील बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वराचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी २४ तास खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
भाविकांना व्यवस्थित दर्शन घेता यावे, म्हणून प्रशासन व मंदिर विश्वस्त समितीतर्फे जय्यत तयारी करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष विकी दांडगे यांनी दिली.
श्रावणी सोमवारनिमित्त येणाऱ्या भाविकांसाठी फराळ, पिण्याचे पाणी, तसेच आरोग्यसेवेसाठी पथक असणार आहे. यंदा भाविकांना दर्शन घेतल्यावर उत्तर दिशेच्या दरवाजातून बाहेर निघता येणार आहे.
पोलिसांचा कडक बंदोबस्त राहणार आहे. यासाठी २५ पोलिस अधिकारी, १२७ कर्मचारी, १४२ गृहरक्षक दलाचे जवान; तसेच जलद कृती दल तैनात राहणार आहेत. परिसरातील हालचालींवर नऊ सीसीटीव्ही कॅमेरे नजर ठेवणार आहेत.