Traffic Rule: ……तर ड्रायव्हिंग लायसन्स होईल रद्द; जाणून घ्या नवीन नियम

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २८ जुलै ।। जर तुम्ही वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करत असाल तर हा निष्काळजीपणा तुम्हाला महागात पडू शकतो. कारण वारंवार वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याने होणारा परिणाम केवळ दंडापुरता मर्यादित नाहीये. जर जास्त प्रमाणात तुमच्या नावाने चालान आले तर तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स रद्द होण्याची शक्यता असते.

प्रत्येक राज्यात वाहतुकीचे नियम वेगवेगळे असतात. अनेक राज्यांमध्ये जर तुम्हाला सलग ३ वेळा चालान आले तर तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स रद्द होऊ शकतो. वाहतूक पोलिसांव्यतिरिक्त, रस्त्यावर बसवलेल्या कॅमेऱ्यांद्वारेही चालान जारी केले जाते. यामुळे एकाच गाडीवर अनेक चालान बसत असतात. तर काही राज्यांमध्ये जर एखाद्याच्या नावावर ५ पेक्षा जास्त चालान असेल तर ड्रायव्हिंग लायसन्स रद्द होण्याची शक्यता असते. जर तुम्ही चालान भरले नाही तर तेही महागात पडू शकते. कारण तुम्हाला पुन्हा ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करावा लागू शकतो.

तुम्हाला यासाठी न्यायालयात अर्ज करावा लागले. जर तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स हरवला असेल, त्याची मुदत संपली असेल किंवा कोणत्याही कारणास्तव रद्द झाले असेल. तर तुम्ही दोन प्रकारे पुन्हा नवीन लायसन्ससाठी अर्ज करू शकता.

ऑनलाइन ड्रायव्हिंग लायसन्स कसे रिन्यू करायचं?

सर्वप्रथम तुम्हाला https://parivahan.gov.in/ वर क्लिक करून परिवहन सेवेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.

होमपेजवरून तुम्हाला ऑनलाइन सेवांवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्सशी संबंधित असलेल्या सेवा निवडाव्या लागतील.

यानंतर तुम्हाला एका नवीन पेजवर जावे लागेल. तेथे तुमच्या राज्याचे नाव निवडावे लागेल.

तुम्ही निवडलेल्या राज्यानुसार एक नवीन पेज उघडेल.

या पेजवर अनेक पर्याय असतील आणि तुम्हाला ‘अर्ज फॉर डीएल रिन्यूअल’ हा पर्याय निवडावा लागेल.

हे केल्यानंतर तुम्हाला अर्ज सबमिट करण्याच्या सूचना दर्शविणारे एक पेज दिसेल.

यानंतर तुम्हाला तुमची माहिती भरावी लागेल.

तुम्हाला आवश्यक कागदपत्रे (जर असतील तर) देखील अपलोड करावी लागतील.

तुम्हाला फोटो अपलोड करण्यास आणि सही करण्यास सांगितले जाऊ शकते. दरम्यान ही स्टेप फक्त काही राज्यांतील लोकांच दिसेल.

यानंतर अर्जाचे शुल्क भरावे लागेल. त्यानंतर पेमेंटचं स्टेट्सची पडताळणी करावी लागेल.

ऑफलाइन ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू कसं करायचं? (How to renew a driving license offline?)

जवळच्या आरटीओ कार्यालयात जा.

फॉर्म २ (नवीन डीएल) किंवा फॉर्म एलएलडी (डुप्लिकेटसाठी) भरा.

यानंतर आवश्यक कागदपत्रे सादर करा.

बायोमेट्रिक पडताळणी आणि चाचणी (लागू असल्यास). पण यासाठी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील.

मोबाईल नंबर आधारशी लिंक केलेला असावा. वैद्यकीय फिटनेस फॉर्म १अ आवश्यक आहे (४० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी). जर डुप्लिकेट डीएल असेल तर एफआयआरची प्रत देखील आवश्यक असेल.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *