Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
Gold-Silver Price: सोने पुन्हा महागले : १० ग्रॅमसाठी किती पैसै मोजावे लागणार - Maharashtra 24

Gold-Silver Price: सोने पुन्हा महागले : १० ग्रॅमसाठी किती पैसै मोजावे लागणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३ ऑगस्ट ।। Gold-Silver Price Today: सराफा बाजारात सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेत. सोन्यांच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ लागत आहे. अशातच आज, ०३ ऑगस्ट २०२५ रोजी, रविवारी भारतीय बाजारात सोन्याच्या दरात घसरणीनंतर मोठा उलटफेर झाल्याचे पाहायला मिळाले आहे. तर चांदीच्या दरातही बदल झाल्याचं पाहायला मिळालं आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे आजचा भाव…आजचे लेटेस्ट दर खाली दिले आहेत.

बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज ०३ ऑगस्ट २०२५ रोजी देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ९९,८१० रुपये आहे. तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर ९१,४९३ रुपये आहे. तर १ किलो चांदीचा दर ११०,५६० रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीचा दर १,१०६ रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात. याबरोबरच तुमच्या शहरात नेमके काय दर आहेत जाणून घेऊ…

तुमच्या शहरातील आजचा सोन्याचा भाव

मुंबई २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ९१,३२८ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत ९९,६३० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ९१,३२८ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ९९,६३० रुपये आहे.
नागपूर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ९१,३२८ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ९९,६३० रुपये इतका आहे.
नाशिक प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ९१,३२८ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ९९,६३० रुपये आहे.

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *